रिया चक्रवर्ती उगवणार सूड? सुशांतच्या बहिणींच्या संकटात वाढ, मोठा फटका बसण्याची शक्यता

रिया चक्रवर्ती उगवणार सूड? सुशांतच्या बहिणींच्या संकटात वाढ, मोठा फटका बसण्याची शक्यता

सुशांतच्या आत्महत्येमागे रिया चक्रवर्ती जबाबदार असल्याचा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केला होता

  • Share this:

नवी दिल्ली, 28 ऑक्टोबर : सुशांत सिंह राजपूत (Sushant singh rajput sucide case) आत्महत्या प्रकरणात प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन बातमी समोर येत आहे. सीबीआय (CBI) या प्रकरणाचा तपास करीत आहे. त्याच्या मृत्यूनंतर न्यायाची मागणी करणाऱ्या सुशांतची बहिणी आता अडचणीत सापडू शकतात. यामागे दुसरं तिसरं कोणी नसून रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) असल्याची माहिती समोर आली आहे.

रिया चक्रवर्तीचा सुशांतच्या बहिणीवर आरोप

सप्टेंबर महिन्यात रिया चक्रवर्तीने सुशांतच्या बहिणीविरोधात एफआयआर दाखल केली होती. त्यांनी आरोप लावला होता की, सुशांतच्या बहिणींनी त्याला चुकीच्या प्रिस्क्रिपशनच्या आधारावर औषधं दिली होती. याच कारणाने सुशांतला पॅनिक अटॅक आला होता. सध्या मुंबई पोलिसांनी एफआयआरची कॉपी सीबीआयकडे दिली आहे. अशात सुशांतच्या बहिणींवरील संकट वाढलं आहे. सीबीआयकडून त्यांना अटक होण्याचे संकेत आहे.

मुंबई हायकोर्टात धाव

अशात सुशांतच्या बहिणींनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. या प्रकरणात लवकरात लवकर सुनावणी करण्याची मागणी केली आहे. सुशांतच्या बहिणींनुसार रियाच्या एफआयआरच्या आधारावर सीबीआय त्यांना अटक करू शकते. सीबीआयच्या या कारवाईपासून बचाव करण्यासाठी प्रियांका आणि मीतू यांनी मुंबई हायकोर्टात पेटिशन फाइल केली आहे. ज्यामध्ये त्यांनी लवकरात लवकर सुनावणीची मागणी केली आहे. जस्टिस एस.एस.शिंदे आणि जस्टिस एम.एस. कर्णिक या प्रकरणाचा विचार करतील.

दरम्यान अभिनेत्री दीपिका पादुकोणची (deepika padukone) मॅनेजर करिश्मा प्रकाशच्या (karishma prakash) घरीच ड्रग्ज सापडल्याची माहिती समोर आली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (NCB) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रिया चक्रवर्ती (rhea chakraborty) प्रकरणात ड्रग्ज पेडलर्सची चौकशी करण्यात आली होती.  रिया प्रकरणात अटक करण्यात आलेल्या ड्रग्ज पेडलर्सच्या चौकशीत करिश्मा प्रकाशचंही नाव समोर आलं. ती या ड्रग्ज पेडलर्सच्या सातत्याने संपर्कात होती, असं उघड झालं. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं तिच्या घरावर छापा टाकला. तेव्हा तिच्या घरात ड्रग्ज सापडले आहेत. तिच्या घरातून  1.8 ग्रॅम चरस जप्त करण्यात आला आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: October 28, 2020, 9:13 PM IST

ताज्या बातम्या