मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'सुशांतची केवळ ही एकच संपत्ती माझ्याकडे आहे', PHOTO शेअर करत रिया चक्रवर्तीचा दावा

'सुशांतची केवळ ही एकच संपत्ती माझ्याकडे आहे', PHOTO शेअर करत रिया चक्रवर्तीचा दावा

अभिनेत्री रिया चक्रवर्तीने काही फोटो शेअर केले आहेत. तिच्याकडे सुशांत सिंह राजपूतची एवढीच संपत्ती असल्याचा दावा अभिनेत्रीने केला आहे

अभिनेत्री रिया चक्रवर्तीने काही फोटो शेअर केले आहेत. तिच्याकडे सुशांत सिंह राजपूतची एवढीच संपत्ती असल्याचा दावा अभिनेत्रीने केला आहे

अभिनेत्री रिया चक्रवर्तीने काही फोटो शेअर केले आहेत. तिच्याकडे सुशांत सिंह राजपूतची एवढीच संपत्ती असल्याचा दावा अभिनेत्रीने केला आहे

  • Published by:  Janhavi Bhatkar

मुंबई, 08 ऑगस्ट : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी (Sushant Singh Rajput Death) अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या अडचणीत वाढ होऊ लागली आहे. शुक्रवारी अंमलबजावणी संचलनालयाने (ED) रियाची तब्बल 8 तास चौकशी केली. सुशांतचे वडील केके सिंह (KK Singh) यांनी असे आरोप केले आहेत की, रिया आणि कुटुंबीयांनी सुशांतच्या खात्यातून पैसे काढले आहेत. तिने 15 कोटी रुपये काढल्याचा आरोप त्यांनी पाटणामध्ये दाखल केलेल्या एफआयआरमध्ये केला होता.

आता रियाने तिच्याकडे असणाऱ्या सुशांतच्या संपतीचा खुलासा केला आहे. अभिनेत्री रिया चक्रवर्तीने आता एक सिपर आणि डायरीतील एक पान शेअर केले आहे. या सिपरवर 'छिछोरे' (Chhichhore) असे लिहण्यात आले आहे. अभिनेत्रीने असा दावा केला आहे की, हा सिपर हिच केवळ सुशांतची संपत्ती माझ्याकडे आहे. सुशांतने या डायरीमध्ये तो कोणत्या गोष्टींबद्दल कृतज्ञ आहे, याची यादीच लिहिली आहे. रियाने हे फोटो शेअर केले आहेत.

रियाच्या वकीलांनी हे फोटो माध्यमांबरोबर शेअर केले आहेत. दरम्यान रियाचा असा दावा आहे, हे पान सुशांतने लिहिले आहे. यामध्ये त्याने तो कशाबाबत कृतज्ञ आहे, ते लिहिले आहे.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार रियाने याबाबत असे स्पष्टीकरण दिले आहे की, 'हे सुशांतचे हस्ताक्षर आहे. यामध्ये त्याने नमूद केलेला Lillu म्हणजे शोविक, Bebu म्हणजे मी, सर म्हणजे माझे वडील आणि मॅम म्हणजे माझी आई तर Fudge त्याचा कुत्रा'.

(हे वाचा-'मला कसं तरी होतंय, मला काही माहित नाही',EDच्या सर्व प्रश्नांवर रियाचे एकच उत्तर)

ईडीने रियाकडून तिच्या मालमत्तेची कागदपत्रं मागितली होती. मात्र रियाने आपली मालमत्तेची कागदपत्रं ईडीसमोर सादर केली नाहीत. तिनं आपली कागदपत्रं सीए रितेश शाहकडे असल्याचं सांगितलं मात्र रितेश शाह यांनीदेखील आपल्याकडे कागदपत्रं असल्याचं नाकारलं. त्यानंतर रियाने आपण कागदपत्रं कुठे ठेवलीत हे आठवत नसल्याचं सांगितलं. अत्यंत कमी उत्पन्न असतानाही रिया चक्रवर्तीने मुंबईत 2 प्रॉपर्टी खरेदी केल्यात. तिच्या आणि कुटुंबीयांच्या नावावर या प्रॉपर्टी आहेत. दरम्यान News18 च्या सूत्रांनुसार शुक्रवारी रियाने अशी माहिती दिली की तिच्या नावावर 3 कंपनी देखील आहेत. मात्र इतर प्रश्नांची उत्तरे देणे तिने टाळले आहे. जवळपास सर्व प्रश्नांची उत्तरे 'मला माहित नाही' किंवा 'मला कसं तरी होत आहे', अशी दिली आहेत.

First published:

Tags: Sushant Singh Rajput