Home /News /entertainment /

रिया नव्हे तर शौविक चक्रवर्तीशी सुशांत शेवटचे फोनवर बोलला, विचारले होते हे दोन प्रश्न

रिया नव्हे तर शौविक चक्रवर्तीशी सुशांत शेवटचे फोनवर बोलला, विचारले होते हे दोन प्रश्न

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर (Sushant Singh Rajpu Death) 75 दिवसांनी तिची बाजू मांडण्यासाठी माध्यमांसमोर आलेल्या रिया चक्रवर्तीने (Rhea Chakraborty) अनेक खुलासे केले आहेत.

    मुंबई, 28 ऑगस्ट : सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर (Sushant Singh Rajpu Death) 75 दिवसांनी तिची बाजू मांडण्यासाठी माध्यमांसमोर आलेल्या रिया चक्रवर्तीने (Rhea Chakraborty) अनेक खुलासे केले आहेत. तिने दिलेल्या मुलाखतीमध्ये असे म्हटले आहे की, 8 जून रोजी ती सुशांतच्या म्हणण्यावरून त्याचे घर सोडून गेली. यानंतर सुशांतने तिला एकदा संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता. सुशांतने 9 जून रोजी तिला एक मेसेज करून तिच्या तब्येतीविषयी विचारले होते. रियाने असे म्हटले आहे की, जेव्हा ती सुशांतचे घर सोडत होती तेव्हा तिला देखील पॅनिक अॅटॅक येत होते. सुशांतबरोबर राहून ती देखील मानसिक आजाराचा सामना करत होती. तिने असे म्हटले आहे की, 8 जून रोजी 11 वाजता तिने एक थेरपी सेशल ठेवले होते. तिला देखील सुशांतबरोहर या थेरपी सेशनमध्ये उपस्थित राहायचे होते मात्र त्याआधीच सुशांतने तिला घराबाहेर काढल्याचे रियाने सांगितले. (हे वाचा-SSR Death Case : CBI चौकशीतून सत्य येणार समोर? रियाला विचारले जात आहेत हे सवाल) तिच्या म्हणण्यानुसार या काळात तिला सुशांतच्या देखरेखीची आवश्यकता होती. मात्र जेव्हा तिला सुशांतची गरज होती त्यावेळी त्याने तिला घराबाहेर काढले. त्यामुळेच जेव्हा सुशांतने 9 तारखेला मेसेजमध्ये तिचे हालहवाल विचारले त्यावेळी त्याला रिप्लाय करण्याऐवजी तिने त्याला ब्लॉक केले. (हे वाचा-SSR Case : अंकिता लोखंडेची पोस्ट शेअर करत कंगनाने साधला रियावर निशाणा) त्यामुळे सुशांतने दुसऱ्या दिवशी तिचा धाकटा भाऊ शौविकला फोन करून विचारले की तो ठीक आहे का? त्यावर त्याने तो ठीक असल्याचे सांगतिले. सुशांतने दुसरा प्रश्न असा विचारला की रिया कशी आहे? यावर देखील शौविकने ती ठीक असल्याचे उत्तर दिले. यानंतर जेव्हा शौविकने त्याच्या तब्येतीविषयी विचारले तेव्हा सुशांतने फार काही उत्तर दिले नाही. अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार रियाच्या कुटुंबामध्ये सुशांतची झालेली ही शेवटची बातचीत होती. त्यानंतर चक्रवर्ती कुटुंबातील कुणाशीच  त्याचे बोलणे झाले नाही.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Sushant Singh Rajput

    पुढील बातम्या