रिया चक्रवर्तीला दाखवला बाहेरचा रस्ता? 'चेहरे'चं पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर चर्चांना उधाण

रिया चक्रवर्तीला दाखवला बाहेरचा रस्ता? 'चेहरे'चं पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर चर्चांना उधाण

चित्रपट मागील वर्षीच प्रदर्शित केला जाणार होता, याचाच अर्थ रियानं या सिनेमातील आपलं चित्रीकरण पूर्ण केलं होतं. त्यामुळे, पोस्टरमध्ये दिसणाऱ्या क्रिस्टलला रियाच्या जागी रिप्लेस केलं गेलं आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.

  • Share this:

मुंबई 23 फेब्रुवारी : मागील वर्षी जून महिन्यात अभिनेता सुशांत सिंग राजपूतनं (Sushant Singh Rajput) आत्महत्या केली. यानंतर सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) चांगलीच चर्चेत आली. रियाचा चेहरे (Chehre) हा सिनेमा मागील वर्षी मे महिन्यातच सिनेमागृहात प्रदर्शित होणार होता. याआधीही सिनेमाची रिलीज डेट टळली आहे. अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी यांच्यासोबत रिया चक्रवर्तीही या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार होती. या दृष्टीनं प्रमोशनही सुरू झालं होतं.

बॉलिवूडमध्ये एकापाठोपाठ अनेक सिनेमांच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाल्यानंतर आता चेहरे सिनेमाह 30 एप्रिलला प्रदर्शित होणार असल्याचं जाहीर झालं आहे. या सिनेमाचं आज पोस्टर रिलीज (Chehre Poster) झालं असून यात अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी पाहायला मिळत आहेत. मात्र, पोस्टरमधून रियाचा चेहरा गायब झाला आहे. रियाच्या जागी या पोस्टमध्ये टीव्ही अभिनेत्री क्रिस्टल डिसूजाचा चेहरा झळकत आहे.

अशात असा प्रश्न उपस्थित होत आहे, की सुशांत सिंह राजपूतची गर्लफ्रेंड, अभिनेत्याच्या आत्महत्येमुळे बदनामी आणि ड्रग्स प्रकरणात तुरुंगात जाऊन आल्यानं रियाला रिप्लेस केलं गेलं आहे का? चित्रपट मागील वर्षीच प्रदर्शित केला जाणार होता, याचाच अर्थ रियानं या सिनेमातील आपलं चित्रीकरण पूर्ण केलं होतं. त्यामुळे, पोस्टरमध्ये दिसणाऱ्या क्रिस्टलला रियाच्या जागी रिप्लेस केलं गेलं आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. की मग आधीप्रमाणंच आताही रिया या सिनेमात आहे, मात्र तिच्या नावाचा वापर मुद्दाम केला जात नाही? असाही प्रश्न आहे. फिल्मसोबत जोडल्या गेलेल्या कोणीही या मुद्द्यावर बोलण्यास तयार नसल्याचं वृत्त एबीपी न्यूजनं दिलं आहे.

Published by: Kiran Pharate
First published: February 23, 2021, 3:09 PM IST

ताज्या बातम्या