रिया चक्रवर्तीचं सोशल मीडिया अकाऊंट हॅक? 'त्या' पोस्टनंतर नेटिझन्सनी व्यक्त केली शंका

रिया चक्रवर्तीचं सोशल मीडिया अकाऊंट हॅक? 'त्या' पोस्टनंतर नेटिझन्सनी व्यक्त केली शंका

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (sushant sing rajput) आत्महत्येनंतर रिया चक्रवर्ती (rhea chakraborty) ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे.

  • Share this:

मुंबई, 17 जुलै : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (sushant sing rajput) आत्महत्येनंतर या प्रकरणाच्या सीबीआय (CBI) चौकशीची मागणी होऊ लागली आहे. काही बॉलीवूड कलाकार, राजकीय नेते आणि सुशांच्या चाहत्यांनी ही मागणी केली आहे. दरम्यान सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीनेदेखील (Rhea chakraborty) या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. रियाने अशी मागणी केली असावी यावर सुशांच्या चाहत्यांचा विश्वास बसत नाही आहे, काही चाहत्यांनी रियाचं सोशल मीडिया अकाऊंट हॅक झाल्याची शंका व्यक्त केली.

सुशांतच्या आत्महत्येला एक महिना पूर्ण झाला. महिनाभर रियाने काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती आणि महिनाभरानंतर तिनं सुशांतच्या मृत्यूच्या सीबीआय चौकशीची मागणी केली. रियाने आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केली आणि मी सुशांतची गर्लफ्रेंड हात जोडून विनंती करते की सुशांच्या आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करा, असं ती म्हणाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांना तिनं ट्वीट केलं आहे. शिवाय इन्स्टाग्रामवरदेखील पोस्ट केली आहे.

"मी सुशांत सिंह राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती. सुशांतच्या निधनाला आता एक महिना झाला. मला सरकारवर पूर्ण विश्वास आहे. मात्र सुशांतला न्याय मिळायलाच हवा यासाठी या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी मी हात जोडून करते. सुशांतने असं पाऊल उचलण्याइतपत त्याच्यावर कोणता दबाव होता मला हे माहिती करून घ्यायचं आहे", असं ट्वीट रियाने केलं.

हे वाचा - सुशांतच्या आत्महत्याप्रकरणी रियाबाबत मोठी बातमी! पोलिसांना मिळाले बँक डिटेल्स

रियाच्या या ट्वीटवरून रिया पुन्हा ट्रोल झाली. तिच्या या ट्वीटवरून नेटिझन्सनी शंका व्यक्त केली आहे.

रियाचं अकाऊंट हॅक झालं आहे का? असा सवाल एका ट्विटर युझरने केला आणि इतर काही जणांनीदेखील तशीच शंका व्यक्त केली. तर काही ट्वीटर युझर्सनी रियाने महिनाभराने ही मागणी का केली, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

हे वाचा - सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी गृहमंत्र्यांचा मोठा खुलासा, CBI ची गरज नाही

दरम्यान रियाला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागतो आहे. त्याचप्रमाणे तिला खुलेआम धमक्या मिळण्याचे सत्र देखील सुरूच होते.  मात्र आता या ट्रोलिंगला आणि धमक्यांना कंटाळून रिया चक्रवर्तीने एक पोस्ट केली आहे. सायबर सेलने यामध्ये लक्ष घालण्याची विनंती रियाने केली आहे.

Published by: Priya Lad
First published: July 17, 2020, 3:53 PM IST

ताज्या बातम्या