सुशांत प्रकरणात रियाची अद्याप निर्दोष सुटका झालेली नाही. या प्रकरणात आता एक नवा ट्विस्ट आला आहे. एनसीबीनं न्यायालयासमोर 30 हजार पानांचं आरोपपत्र दाखल केलं. एनसीबीचे प्रमुख समीर वानखेडे यांनी स्वतः हे आरोपपत्र सादर केलं. या आरोपपत्रात रिया चक्रवर्ती आणि तिच्या भावासोबतच आणखी 30 जणांनी नावं आहेत. शिवाय या प्रकरणी काही ड्रग्ज पेडलर्सला देखील एनसीबीनं अटक केली आहे. 14 जून 2020 रोजी सुशांत सिंह राजपूतचा मृतदेह संशयास्पद आढळून आला होता. त्यानंतर एम्स रुग्णालयाकडून सुशांतच्या मृत्यूचं नेमकं कारण शोधण्यासाठी प्रयत्न सुरु होता. यासाठी डॉक्टर सुधीर गुप्ता यांच्या नेतृत्त्वाखाली तज्ञ डॉक्टरांची एक टीम तयार करण्यात आली होती. डॉक्टरांच्या टीमनं दिलेल्या माहितीनुसार सुशांतनं आत्महत्या केली होती. हा रिपोर्ट सीबीआयकडे देखील सोपवण्यात आला. सीबीआयने एम्स रुग्णालयाकडे पोस्टमॉर्टम तसंच व्हिसेरो रिपोर्टचा अभ्यास करण्याची विनंती केली होती. एम्स डॉक्टरांनी दिलेली माहिती आणि सीबीआय तपासात समोर आलेल्या गोष्टी एकत्र करुन पडताळून पाहिल्या जात आहेत.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood actress, Crime, International women's day, Rhea chakraborty, Star celebraties, Sushant Singh Rajput