मुंबई, 4 सप्टेंबर : सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाच्या ड्रग्ज अँगलमुळे वेगळं वळण मिळालं आणि या प्रकरणी आता रिया चक्रवर्तीच्या भाऊ शोविकला नार्कोटिक्स विभागाने (NCB) बेड्या ठोकल्या आहेत.
शोविक चक्रवर्तीला अंमली पदार्थ प्रतिबंध कायदा कलम 20 ( ब ), कलम 28, कलम 29 आणि कलम 27 ( अ ) या कलमांतर्गत अटक करण्यात आली. शोविकसोबतच सुशांत सिंग राजपूतचा मॅनेजर सॅम्युल मिरांडा याला देखील याच कलमा खाली अटक करण्यात आली.
उद्या सकाळी शौविक चक्रवर्तीला न्यायालयात हजर केलं जाणार आहे. अंमली पदार्थ प्रतिबंध कायदा २७ (अ) हे अजामीनपात्र कलम लावण्यात आल्याने शोविकला उद्या किंवा NCB कोठडी संपल्यावर लवकरात लवकर जामीन मिळणार नाही, असं कायदा सांगतो. पुढचे काही दिवस शोविकला NCB कोठडीत किंवा जेलमध्येच काढावे लागणार हे नक्की.
Narcotics Control Bureau arrests Rhea Chakraborty's brother Showik Chakraborty and Samuel Miranda, in Sushant Singh Rajput death case: NCB
— ANI (@ANI) September 4, 2020
बसित, जैद, शोविक आणि सॅम्युल मिरांडा यांची समोरा समोर बसून चौकशी केली असता शोविकच्या सांगण्यावरून बसितने जैदकडून अंमली पदार्थ आणले, तर जैदकडून शोविकने अंमली पदार्थ घेतले, असं समोर आलं आहे. 'शोविक अंमली पदार्थ घेऊन सॅम्युलकडे गेला आणि शोविकच्या सांगण्यावरून अंमली पदार्थांचे पैसे दिले', असं सॅम्युएल मिरांडाने कबूल केलं आहे. हे अंमली पदार्थ सॅम्युलने सुशांत सिंग राजपूतला दिले अशी कबूलीही या सर्वांनी दिली आहे. त्यामुळे एनसीबीने शोविक आणि सॅम्युल मिरांडा यांना अटक केली आहे.
रियाचा भाऊ शोविक आणि रियाचा खास माणूस सॅम्युल मिरांडा यांच्या अटकेमुळे आता रियाच्या अटकेची ही दाट शक्यता निर्माण झाली आहे. कारण शोविक आणि रिया यांच्यातदेखील अंमली पदार्थ खरेदी विक्री बाबतीत चॅटिंग झाले असून रियाचे संशयित अंमली पदार्थ तस्कर गौरव आर्या याच्यासोबतची चॅट समोर आली आहेत. या चॅटवरूनच हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात रियाला मुख्य आरोपी दाखवण्यात आल आहे. त्यामुळे रियाच्या अटकेचीही दाट शक्यता निर्माण झाली आहे.