Home /News /entertainment /

Reshma Shinde: गर्ल्स नाईट आऊटला मुली काय करतात असा प्रश्न पडला असेल तर हा मजेदार video पाहाच

Reshma Shinde: गर्ल्स नाईट आऊटला मुली काय करतात असा प्रश्न पडला असेल तर हा मजेदार video पाहाच

मराठी इंडस्ट्रीतील तीन घट्ट मैत्रिणी नाईटआउटला सध्या बरीच धमाल करताना दिसत आहेत. त्यांचा एक व्हिडिओ तुफान viral होत आहे.

  मुंबई 6 जुलै: मराठी इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्रीची असलेली घट्ट मैत्री हा एक मजेदार विषय आहे. जुन्या मालिकांपासून सुरु झालेली मैत्री आजही अनेक अभिनेत्रींनमध्ये टिकून आहे. असंच एक त्रिकुट म्हणजे (Abhidnya Bhave) अभिज्ञा भावे, (Reshma Shinde) रेश्मा शिंदे आणि (Anuja Sathe) अनुजा साठे या तीन मैत्रिणीचं. या तिघी कायम एकमेकींसोबत हँगआउट करताना दिसतात. सध्या रेश्मा शिंदेने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलेल्या एका व्हिडिओकंची जबरदस्त चर्चा होताना दिसत आहे. लगोरी या मालिकेच्या निमित्ताने या तीन अभिनेत्रीची मैत्री झाली होती. त्यांनी काही दिवसांपूर्वी गर्ल्स नाईटआउट केला होता. त्यावेळी धमाल करतानाचे काही विडिओ आणि रील त्यांनी शेअर केले होते. सध्या या तिघींचा एक विडिओ चाहत्यांना पोट धरून हसायला भाग पाडतो आहे. या रीलमध्ये या तीनही अभिनेत्री ‘शायद मेरे शादी का खयाल’ या गाण्यावर तुफान कॉमेडी करताना दिसत आहे. घरातील काही वस्तू घेऊन त्यावर ताल धरत lip sync करत त्यांनी हा व्हिडिओ शूट केला आहे. यात रेश्मा शिंदे ही अभिनेत्री हेअर ड्रायर हातात घेऊन गाणं म्हणताना दिसत आहे. एकूणच त्यांचा हा अवतार बघून चाहत्यांना हसू आवरणं कठीण झालं आहे. हे ही वाचा-दिग्दर्शक रवी जाधवचं ओटीटीवर पदार्पण, बॉलिवूडच्या मोठ्या कलाकारांबरोबर घेऊन येतोय हिंदी वेब सिरीज इन्स्टाग्रामवर रील्सची वाढती क्रेझ बुद्धीला चालना देणारी असते याची प्रचिती हा व्हिडिओ बघून येत आहे. वेगवेगळे ट्रेंड फॉलो करणारी कलाकार मंडळी अशी धमाल सुद्धा करताना दिसतात. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करून त्यांच्या या भन्नाट कल्पनाशक्तीचं कौतुक केलं आहे. तसंच मराठी इंडस्ट्रीतील काही कलाकारांनी सुद्धा या व्हिडिओचा आनंद घेत कमेंट केल्याचं दिसून येत आहे.
  वर्क फ्रंटवर सांगायचं तर या तिन्ही मैत्रिणी फार उत्तम कामगिरी करताना दिसत आहेत. रेश्मा ही स्टार प्रवाहवरील मालिकेत झळकत असून अभिज्ञा सुद्धा झी मराठीवरील मालिकेत एका भन्नाट भूमिकेत रोज पाहायला मिळते. अनुजा सध्या कोणत्या नवीन प्रोजेक्टमध्ये दिसणार याची सगळ्यांना उत्सुकता आहे. शूटिंग आणि व्यस्त शेड्युलमधून वेळ काढत या मैत्रिणी अनेकदा सोबत वेळ घालवताना दिसतात.
  Published by:Rasika Nanal
  First published:

  Tags: Marathi actress, Marathi entertainment, Tv actress, TV serials

  पुढील बातम्या