VIDEO : राजेशच्या एंट्रीवर रेशमची पहिली प्रतिक्रिया

VIDEO : राजेशच्या एंट्रीवर रेशमची पहिली प्रतिक्रिया

  • Share this:

मुंबई, 16 जून : बिग बाॅसच्या घरात रेशम टिपनिस आणि राजेश श्रृंगारपुरे यांची जोडी चांगली गाजली. घराबाहेर गेलेला राजेश आता पुन्हा एकदा बिग बाॅसच्या घरात येत आहे. त्याला पाहिल्यावर रेशमची प्रतिक्रिया अत्यंत बोलकी होती.

रेशम टिपणीस आणि राजेश श्रृंगारपुरे यांच्यातील जवळीकमुळे एकच कल्लोळ माजला होता. बिग बाॅसच्या घरात दोघांच्या जवळीकवर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. एवढंच नाहीतर नाशिकमध्ये अश्लिलता पसरवल्यामुळे गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे 20 मे रोजी राजेशला बिग बाॅसच्या घरातून बाहेर पडावं लागलं होतं.

बिग बाॅसच्या घरात राजेश श्रृंगारपुरे परत येतोय !

आता तीन आठवड्याच्यानंतर हे वादळ शांत झाल्यावर आता पुन्हा एकदा बिग बाॅसने राजेशला घरात प्रवेश करण्यास एंट्री दिलीये. लवकरच राजेश वाईल्ड काॅर्डद्वारे घरात पाहण्यास मिळणार आहे.

आता पुन्हा राजेशची घरात एंट्री होणार आहे. त्यामुळे त्याची ही एंट्री किती दिवसाची असेल ह्याची उत्सुकता आहे. राजेशच्या येण्याने घरातली समीकरण नव्याने बदलणार एवढं नक्की...

video सौजन्य - कलर्स मराठी

First published: June 16, 2018, 7:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading