S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

14 वर्षांनंतर रेणुका शहाणेंचा हा नवीन लुक पाहिलात का?

या सिनेमातून सलमान खान आणि माधुरी दीक्षितची केमेस्ट्री आपण सगळ्यांनीच पाहिली. पण छोट्या भूमिकेतून आपली वेगळी छबी उमटवणारी अभिनेत्री म्हणजे रेणुका शहाणे

Renuka Dhaybar | Updated On: Feb 9, 2018 11:48 AM IST

14 वर्षांनंतर रेणुका शहाणेंचा हा नवीन लुक पाहिलात का?

09 फेब्रुवारी : हम आपके है कोन हा सिनेमा आपल्या सगळ्यांच्या मनावर आजही राज्य करत आहे. या सिनेमातून सलमान खान आणि माधुरी दीक्षितची केमेस्ट्री आपण सगळ्यांनीच पाहिली. पण छोट्या भूमिकेतून आपली वेगळी छबी उमटवणारी अभिनेत्री म्हणजे रेणुका शहाणे. तब्बल 14 वर्षांनंतर रेणुका शहाणे एका नव्या रुपात आपल्याला पहायला मिळणार आहे. त्यांच्या आगमी सिनेमाचं पहिलं लुक सोशल मीडियावर शेअर करण्यात आलं आहे.

रेणुका शहाणे सध्या त्यांच्या आगमी सिनेमासाठी व्यस्त आहेत. या सिनेमासाठीचं त्यांचं पहिलं लुक पाहिलं तर त्यांना ओळखताच येत नाही. नुकतंच त्यांच्या या आगमी सिनेमाचं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. या पोस्टरमध्ये पांढरे केस आणि बॉयकट अशा वयस्कर लुकमध्ये त्या आपल्याला पहायला मिळतात. त्यांचा हा आगामी सिनेमा येत्या 9 मार्चला आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे.या सिनेमात रेणुका शहाणे यांच्यासोबत पुलकित सम्राट, ऋचा चड्डा आणि शर्मन जोशी यांच्याही मुख्य भूमिका आहे.

माझी मुलं आता मोठी झाली आहेत. त्यामुळे सिनेमात पुन्हा काम करायला हरकत नाही असं रेणुका यांनी एका मुलाखतीत सांगितलं. त्यांच्या या हटले लुकमुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये सिनेमाची उत्सुकता चांगलीच वाढली आहे.

रेणुका शहाणे यांच्या या नव्या आणि हटके लुकमुळे त्यांच्या नव्या सिनेमाची उत्सुकता वाढली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 9, 2018 11:48 AM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close