Home /News /entertainment /

'राणाजींबरोबरचं लग्न टिपिकल नव्हतं..' रेणुका शहाणेंनी सांगितला देवळातल्या लग्नाच्या आहेराचा किस्सा

'राणाजींबरोबरचं लग्न टिपिकल नव्हतं..' रेणुका शहाणेंनी सांगितला देवळातल्या लग्नाच्या आहेराचा किस्सा

band baja varat : रेणुका शहाणे यांनी एका मुलाखतीत त्यांचा लग्नाचा किस्सा शेअर केला आहे. यासोबत त्यांना लग्नात आहेर म्हणून काय मिळालं होतं याचा देखील खुलासा केला आहे.

  मुंबई, 10 मार्च : लोकप्रिय अभिनेत्री रेणुका शहाणे ( renuka shahane ) यांनी बऱ्याच काळानंतर  झी मराठीवरील बँड बाजा वरात (band baja varat )रेणुका शहाणे यांनी एका मुलाखतीत त्यांचा लग्नाचा किस्सा शेअर केला आहे. यासोबत त्यांना लग्नात आहेर म्हणून काय मिळालं होतं याचा देखील खुलासा केला आहे. या आगामी कार्यक्रमातून त्या छोट्या पडद्यावर कमबॅक करणार आहेक. रेणुका शहाणे हा शो होस्ट करताना दिसणार आहे. बँड बाजा वरात या नावावरून समजतं की हा कार्यक्रम लग्नाशी संबंधी आहे. रेणुका शहाणे यांनी एका मुलाखतीत त्यांचा लग्नाचा किस्सा शेअर केला आहे. यासोबत त्यांना लग्नात आहेर म्हणून काय मिळालं होतं याचा देखील खुलासा केला आहे. रेणुका यांनी बॉलिवूड अभिनेते आशुतोष राणा यांच्याशी लग्न केले आहे. त्यांचे हे दुसरे तर आशुतोष यांचे पहिले लग्न आहे. त्यांची लव्हस्टोरी खूपच रंजक आहे. बँड बाजा वरात या शोच्या निमित्ताने रेणुका शहाणे यांनी peepingmoon marathi या वेबसाईटला नुकतीच मुलाखत दिली. यावेळी त्यांनी त्यांच्या लग्नाची आठवण सांगत एक खास किस्सा सगळ्यांसमोर शेअर केला. वाचा-बिग बॉसमधील त्रिकूट निघालं गोव्याला, पण चाहते करतायत या स्पर्धकाला मिस यावेळी रेणुका शहाणे यांना एक प्रश्न विचारण्यात आला. तो म्हणजे, लग्नसोहळा हा अत्यंत जिव्हाळयाचा विषय असतो, लग्नातील आहेर हि सप्रेम भेट आणि आशीर्वाद मानले जातात, तुम्हाला आहेरात मिळालेली अशी कुठली अमूल्य वस्तू आहे जी तुम्ही आजही जपली आहे? यावेळी रेणुका म्हणाल्या की, आमचं लग्न टिपिकल लग्न नव्हतं. आम्ही मंदिरात लग्न केलं, त्यामुळे त्या लग्नात खूप लोकं आम्हाला शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होती, पण आम्ही आहेर स्वीकारला नव्हता. माझ्या सासरकडून माझे मोठे दीर यांनी माझ्या स्वागतासाठी एक पत्र लिहिलं होतं, त्यांनी दिलेलं ते पत्र मी अजून जपून ठेवलं आहे. त्यामुळे ते पत्र माझ्यासाठी खूप महत्वाचा आहेर आहे असं मी म्हणेन. वाचा-'दोन भारतांचा विचार करायला लावतो', रितेश देशमुखचं 'झुंड'बद्दलचं ट्वीट चर्चेत तसेच त्या या कार्यक्रमाविषयी सांगताना म्हणाल्या की, कार्यक्रम अगदी वेगळ्या स्वरूपाचा आहे. भावी नववधू आणि नववर व त्यांचं कुटुंब हे या कार्यक्रमात सहभागी होणार असून त्यांच्यासोबत आम्ही काही मजेशीर खेळ खेळणार आहोत तसंच या कार्यक्रमातून त्यांच्या आयुष्याच्या प्रवासाच्या काही गमतीजमती प्रेक्षकांसमोर येतील. असा कार्यक्रम प्रेक्षकांनी या आधी पाहिलेला नाही आहे त्यामुळे प्रेक्षकांमध्ये देखील खूप उत्सुकता दिसतेय. कारण लग्न समारंभ हा नववधू आणि नववर यांच्यासाठी खूप महत्वाचा दिवस असतो त्यामुळे तो दिवस खास कसा होईल याकडे कल असलेला हा कार्यक्रम आहे.
  या कार्यक्रमता रेणुका शहाणे यांच्यासोबत पुष्कराज चिरपुटकर देखील दिसणार आहे. या फ्रेश जोडीला या शोमध्ये पाहण्यासाठी चाहते देखील उत्सुक आहेत. हा कार्यक्रम 18 मार्च पासून शुक्रवार आणि शनिवार रात्री 9.30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या कार्यक्रमाच्या प्रोमोने प्रेक्षकांची कार्यक्रमाबद्दलची उत्सुकता वाढवली आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment, Zee marathi serial

  पुढील बातम्या