मुंबई, 20 जानेवारी : बॉलिवूडमधून एक वाईट बातमी समोर आली आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरियोग्राफर रेमो डिसूजा (Remo D’Souza) याचा मेव्हणा (Brother in Law) जॅसन वॉटकिंस (Jason Watkins) आपल्याच घरात मृतावस्थेत आढळला. जॅसननेदेखील चित्रपट क्षेत्रात काम केलं होतं. तो रेमोची चित्रपटं असिस्ट करीत होता. आपल्या भावाच्या निधनाने रेमोच्या पत्नीला जबर धक्का बसला आहे. लिजेल डिसूजा (Lizelle D’Souza) हिन इंस्टा पोस्ट करीत भावाचा फोटो शेअर केला आहे. (Remo DSouzas brother in law was found dead at home, Shocked is sister Lizelle DSouza, Mumbai Police investigating)
जॅसन वाटकिंस मुंबईतील अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळला
ईटाइम्सच्या बातमीनुसार, जॅसन मुंबईतील राहत्या घरात मृतावस्थेत आढळला. मेडिकल अधिकाऱ्याने सांगितलं की, जॅसनला कूपर रुग्णालयात आणण्यात आले होते. आपल्या भावाच्या अचानक झालेल्या निधनामुळे रेमोच्या पत्नीला स्वत:ला सावरण कठीण झालं आहे.
रेमो डिसूजाची पत्नी लिजेलने भावासोबतचा लहानपणीचा फोटो इंस्टावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये जॅसन रिक्षात आपल्या आईसोबत बसले आहेत.
लिजेलने त्याची माफी मागत लिहिलं की, सॉरी आई मी खरी उतरू शकले नाही. रेमो डिसूजा गोव्यात आपल्या मित्राच्या लग्नात होते. रेमो आणि त्यांची पत्नी याच आठवड्यात एअरपोर्टवर दिसले होते. लिजेलने आपल्या इन्स्टावरुन काही वेळापूर्वी सेलिब्रेशनचा एक व्हिडीओही शेअर केला होता.
रेमो डिसूजाला असिस्ट करीत होता जॅसन..
जॅसनने रेमो डिसूजा आणि सरोज खान यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला होता. याशिवाय रेमो आणि क्रू मेंबर्ससह रेस 3 च्या शूटिंगच्या वेळेसचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले होते.
Published by:Meenal Gangurde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.