फक्त 7 महिन्यात रेमो डिसूजाच्या पत्नीनं असं कमी केलं वजन

फक्त 7 महिन्यात रेमो डिसूजाच्या पत्नीनं असं कमी केलं वजन

रेमोनं त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर पत्नी लिजेलचा फोटो शेअर केला आहे.

  • Share this:

मुंबई, 7 जुलै : फिट राहणं आजकाल सर्वांनाच आवडतं. पण त्यात करून तुमचा पार्टनर फिट असेल आणि तुम्ही फॅट असाल तर मात्र हे तुमच्यासाठी एक चॅलेंज ठरतं. असंच एक चॅलेंज प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि डायरेक्टर रेमो डिसूजाच्या पत्नीनं 7 महिन्यांपूर्वी घेतलं होतं आणि तिनं खूप मेहनत करून या सात महिन्यात स्वतःचं वजन कमी केलं. रेमोनं स्वतःच त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर पत्नी लिजेलचा फोटो शेअर केला आहे. ज्यात मागच्या 7 महिन्यात तिच्यातील बदल दिसून येत आहे.

रेमोनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर लिजेलचा एक कोलाज फोटो शेअर केला आहे. ज्यातील एका फोटो 7 महिन्यांपूर्वीचा आहे तर दुसरा फोटो आत्ताचा आहे. रेमोनं फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘ही ती गोष्ट आहे ज्याला तुम्ही डेडिकेशन म्हणू शकता. मला तुझा अभिमान वाटतो. तु हे सिद्ध करून दाखवलंस की, IMPOSSIBLE चा अर्थ असतो I M POSSIBLE. अशीच मला नेहमी प्रेरणा देत राहा आणि प्रेम करत राहा.’ रेमो आणि लिजलचं लव्ह मॅरेज असून ते एका डान्स ग्रुपमध्ये होते आणि बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम करत होते. सुरुवातीला असलेली मैत्री नंतर प्रेमात बदलली आणि त्यांनी लग्न केलं. आता त्यांना दोन मुलं सुद्धा आहेत.

Birthday Special : साक्षीच्या आधी महेंद्रसिंग धोनीनं ‘या’ अभिनेत्रींना केलंय डेट

रेमो सध्या त्याचा आगामी सिनेमा स्ट्रीट डान्सरच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या सिनेमात वरुण धवन, श्रद्धा कपूर आणि नोरा फतेही यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन सुद्धा रेमोच करत आहे. या अगोदर रेमोनं ‘रेस-3’, ‘फ्लाइंग जट्ट’, ‘ABCD’, ‘ABCD-2’ आणि ‘FALTU’ या सिनेमांतं दिग्दर्शन केलं आहे. तर कोरिओग्राफर म्हणून 1995 पासून तो काम पाहत आहे. याशिवाय त्यानं झलक दिखला जा डान्स प्लस आणि डान्स प्लस 3 या रिअ‍ॅलिटी शोमध्ये परिक्षक म्हणून काम पाहिलं आहे.

ग्लॅमरमध्ये बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देते श्वेता तिवारीची मुलगी, पाहा फोटो

==========================================================

EXCLUSIVE VIDEO: शिवानी सुर्वे वाईल्ड कार्डवर बिग बॉसमध्ये परतणार?

First published: July 7, 2019, 12:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading