VIDEO : 21 तास हे लोक आरसाच बघत असतात, 3 तास स्वप्न बघू दे - पुलं

भाई व्यक्ती की वल्लीचा उत्तरार्ध रिलीजसाठी सज्ज झालाय. पाहा त्याचा ट्रेलर

News18 Lokmat | Updated On: Jan 16, 2019 07:48 PM IST

VIDEO : 21 तास हे लोक आरसाच बघत असतात, 3 तास स्वप्न बघू दे - पुलं

मुंबई, 16 जानेवारी : भाई व्यक्ती की वल्ली सिनेमाचा पूर्वार्ध रिलीज झाला. प्रेक्षकांनी तो हाऊसफुल केला. काहींना सिनेमा खूप आवडला, तर काहींना पुलंचं वेगळं रूप बघायचं होतं, ते बघायला मिळालं नाही, म्हणूनही खंत वाटली. पण सिनेमाला सगळ्यांनीच गर्दी केली.

सगळ्यांना उत्सुकता आहे ती उत्तरार्धाची. कला ते राजकारण आणि राजकारण ते रंगमंच प्रत्येक क्षेत्रात पुलंनी लोकांच्या मनावर कायम अधिराज्य केलं. त्यांच्या आयुष्याचा हाच प्रतिभावान प्रवास उलगडलाय उत्तरार्धात. हा उत्तरार्ध फेब्रुवारीत रिलीज होतोय.

सिनेमाचा नवा ट्रेलर रिलीज झालाय. त्यात पंडित नेहरू, बाबा आमटे असे सगळेच भेटतात. पुलंची नाटकंही यात आहेत, तसंच त्याचं समाजकारणही. शिवाय सुनीताबाई आणि पुलं याचं घट्ट होणारं सहजीवनही दिसतं.


पूर्वार्धात पुलंची भूमिका सागर देशमुखनं साकारली होती, तर इरावती हर्षे हिने सुनीता बाईंची भूमिका साकारली. पण आता उत्तरार्धात वयोवृद्ध पुलं साकारणार आहेत विजय केंकरे. आणि वृद्ध सुनीताबाई उभ्या करणार आहेत शुभांगी दामले.

Loading...

पहिल्या भागात 'कानडा राजा पंढरी'चा हे गाणं नव्यानं सिनेमात पाहायला मिळालं. भाईंसमवेत कुमार गंधर्व, भीमसेन जोशी आणि वसंतराव देशपांडे यांच्या मैफलीत सुरू झालेला विठ्ठलाचा गजर तितकाच श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून गेला. राहुल देशपांडे, जयतीर्थ मेवुंडी, भुवनेश कोमकली यांच्या सुरांची जादू या गाण्यात पाहायला मिळाली.

महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे.  त्यांचं व्यक्तिचित्रण किती खुसखुशीत असू शकतं, कथेतील  प्रत्येक पात्र वाचकाला किती भुरळ घालू शकतात, हे ज्यांच्या लिखाणशैलीतून कळतं. लिखाणाची शैली अशी अतरंगी की त्या व्यक्तीच्या प्रेमात माणूस पडतो.  हास्य आणि व्यंग यांचा अलौकिक ताळमेळ म्हणजे ही व्यक्ती. लोकप्रिय लेखक, गीतकार, संगीतकार, कथाकार, नाटककार, गायक दिग्दर्शक आणि अभिनेते असे अष्टपैलू व्यक्तिमत्व जे खऱ्या अर्थाने  महाराष्ट्राचं भूषण होतं.


टीव्हीवरच्या लोकप्रिय 'भाभीजीं'नी केलं हाॅट Photoshoot

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 16, 2019 07:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...