10 एप्रिल : रामगोपाल वर्माच्या 'सरकार 3'चं रिलीज पुन्हा एकदा पुढे ढकलण्याची शक्यता आहे. हा सिनेमा 7 एप्रिलला रिलीज होणार होता. त्यानंतर तो 12मे रोजी रिलीज होणार, असं कळलं. पण आताही तो पुढे ढकलण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे सिनेमाला डिस्ट्रिब्युटर मिळत नाहीय.
रामगोपाल वर्मा डिस्ट्रिब्युटर्सकडे जास्त पैशाची मागणी करतोय. अमिताभ बच्चन, मनोज वाजपेयी, यामी गौतम असे मोठे स्टार्स असल्यामुळे राम गोपाल वर्माची मागणी वाढलीय. पण राम गोपाल वर्माचा मागचा रेकाॅर्ड पाहता, डिस्ट्रिब्युटर्स ही जोखीम घ्यायला तयार नाहीत.
सिनेमाचे निर्माते इराॅसनं मात्र ही गोष्ट नाकारलीय. पण तरीही सिनेमाचं रिलीज पुढे ढकललं का जातंय, याचं उत्तर त्यांच्याकडे नाही.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा