मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /मिस युनिव्हर्स हरनाज संधूने स्पर्धा जिंकताच केला कपिलच्या आत्याला फोन; काय आहे दोघींचं नातं?

मिस युनिव्हर्स हरनाज संधूने स्पर्धा जिंकताच केला कपिलच्या आत्याला फोन; काय आहे दोघींचं नातं?

 मिस युनिव्हर्स 2021 ( Miss Universe 2021 ) स्पर्धा यंदा इस्रायलला ( Israel ) आयोजित करण्यात आली होती. यामध्ये भारताने  ( India ) विजेतेपद जिंकून पुन्हा एकदा इतिहास ( made history ) रचला आहे. पंजाबच्या हरनाज संधूने  (Harnaaz Sandhu)  79 हून अधिक देशांतील सौंदर्यवतींना मागे टाकत मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला.

पुढे वाचा ...

  मुंबई, 14 डिसेंबर-   मिस युनिव्हर्स 2021 ( Miss Universe 2021 ) स्पर्धा यंदा इस्रायलला ( Israel ) आयोजित करण्यात आली होती. यामध्ये भारताने   ( India )  विजेतेपद जिंकून पुन्हा एकदा इतिहास ( made history ) रचला आहे. पंजाबच्या हरनाज संधूने   (Harnaaz Sandhu)   79 हून अधिक देशांतील सौंदर्यवतींना मागे टाकत मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला. पण तुम्हाला माहिती आहे का, मिस युनिव्हर्स झालेल्या हरनाजचं 'द कपिल शर्मा शो'  (The Kapil Sharma Show)  मध्ये 'बुआ' हे पात्र करणाऱ्या उपासना सिंग (Upasana Singh) हिच्यासोबत काय नातं आहे ?

  मिस युनिव्हर्स 2021 स्पर्धा यंदा भारताने जिंकली आहे. चंदीगडच्या हरनाज संधूने 70 व्या मिस युनिव्हर्सचा किताब जिंकून जगभरात भारताचं नाव उंचावलं आहे. 21 वर्षीय हरनाजने मिस साऊथ आफ्रिका आणि मिस पॅराग्वे यांचा पराभव करत विश्वसुंदरीचा किताब पटकावलाय. 'द कपिल शर्मा शो' मध्ये भूमिका करणाऱ्या उपासना सिंगसोबत हरनाजचं विशेष नातं आहे. त्यामुळेच सौंदर्य स्पर्धा जिंकल्यानंतर तिने उपासनाला फोन करून ही आनंदाची बातमी दिली होती.

  स्पर्धेतील टॉप 3 स्पर्धकांना प्रश्न विचारण्यात आला होता. तरुणींना कोणत्या ना कोणत्या दबावाला सामोरे जावं लागतं, त्यांना काय सल्ला देऊ इच्छिता ? हरनाजने या प्रश्नाचे सुंदर पद्धतीने उत्तर देऊन उपस्थितांचीही मने जिंकली. ती म्हणाली, 'मला वाटतं की आजच्या तरुणाईला स्वत:वर विश्वास ठेवण्याचं दडपण जाणवत आहे. स्वतःची इतरांसह तुलना करणं थांबवा आणि जगात घडणाऱ्या सर्वात महत्त्वाच्या गोष्टींबाबत चर्चा करा. स्वतःसाठी बोला, कारण तुम्हीच तुमच्या जीवनाचे आदर्श आहात, तुम्हीच तुमचा आवाज आहात. माझा स्वतःवर विश्वास होता आणि म्हणूनच मी आज येथे उभी आहे.'

  स्पर्धा जिंकल्यानंतर तिने उपासनासिंगला कॉल करून माहिती दिली. याबाबत माहिती देताना उपासना म्हणाली, 'हरनाजने विजेतेपद जिंकल्यानंतर मला कॉल केला आणि ती आनंदाने किंचाळली. यावेळी ती खूप भावूक झाली होती. ती जेव्हाही मुंबईत येते तेव्हा माझ्यासोबत राहते. मिस इंडियानंतर जेव्हा तिचं ट्रेनिंग सुरू झाली, तेव्हा ती आमच्या घरी पाच दिवस राहिली. मी यापूर्वीच दोन चित्रपटांसाठी हरनाजला साइन केले आहे.'

  पंजाब फिल्म इंडस्ट्रीमध्ये निर्माती म्हणून उपासना सिंगची ओळख आहे. पंजाबी चित्रपट बनवण्यात ती आघाडीवर असते. ती तिच्या मुलाला हरनाज संधूसोबत चित्रपटसृष्टीत लाँच करण्याच्या तयारीत आहे. एका मुलाखतीत उपासनाने सांगितले, 'हरनाज इस्रायलला जाण्यापूर्वी माझ्यासोबत राहत होती. तिने एकदा माझ्यासाठी राजमा-भात बनवला होता. ती अनेकदा आत्मविश्वासाने सांगायची की, मिस युनिव्हर्सचा किताब जिंकेल. आज तिने वचन पूर्ण केलं. ज्याने आपल्या देशाला गौरव मिळवून दिला ती व्यक्ती माझ्या चित्रपटाचा एक भाग आहे, याचा मला खूप आनंद आहे.'हरनाज संधूने मिस युनिव्हर्स स्पर्धेचा किताब जिंकल्यानंतर भारतात आनंदाची लाट पसरलीय. सोशल मीडियावर सर्वजण तिचे अभिनंदन करत आहेत. तसेच यापूर्वी ही स्पर्धा जिंकलेल्या सुष्मिता सेन आणि लारा दत्ता यांचेही फोटो व्हायरल होऊ लागले आहेत.

  First published:

  Tags: Entertainment, The kapil sharma show