मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

या अभिनेत्रींना मिळालं नाही संसाराचं सुख; लग्नानंतर काही वर्षातच झाल्या विधवा

या अभिनेत्रींना मिळालं नाही संसाराचं सुख; लग्नानंतर काही वर्षातच झाल्या विधवा

चंदेरी दुनियेची चमक धमक जितकी आकर्षक तितकीच विदारक एक काळी बाजूही आहे. इथल्या स्वप्नांच्या मागे धावताना अनेकांच्या आयुष्याचा चुराडा झाला आहे.

चंदेरी दुनियेची चमक धमक जितकी आकर्षक तितकीच विदारक एक काळी बाजूही आहे. इथल्या स्वप्नांच्या मागे धावताना अनेकांच्या आयुष्याचा चुराडा झाला आहे.

चंदेरी दुनियेची चमक धमक जितकी आकर्षक तितकीच विदारक एक काळी बाजूही आहे. इथल्या स्वप्नांच्या मागे धावताना अनेकांच्या आयुष्याचा चुराडा झाला आहे.

मुंबई 1 एप्रिल: बॉलिवूडचा (Bollywood) लखलखाट अनेकांना भुरळ घालतो. लाखो लोक या चंदेरी दुनियेत आपलं नशीब अजमावायला येतात. पण या दुनियेची चमक धमक जितकी आकर्षक तितकीच विदारक एक काळी बाजूही आहे. इथल्या स्वप्नांच्या मागे धावताना अनेकांच्या आयुष्याचा चुराडा झाला आहे. बॉलीवूडमध्ये यशाची शिखरं गाठणाऱ्या काही यशस्वी अभिनेत्रींना (Actresses) तर अगदी लहान वयातच आपल्या जोडीदाराला गमावण्याचे दुःख सोसावे लागले आहे. यामध्ये सर्वात पाहिलं नाव येतं ते अभिनेत्री रेखाचे (Rekha). एव्हरग्रीन लिजंड म्हणून ओळखली जाणाऱ्या रेखा आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात. देशविदेशात प्रसिद्ध असणाऱ्या या अभिनेत्रीचे संसाराचे स्वप्न मात्र अपूर्णच राहिले आहे. 1990 मध्ये त्यांनी दिल्लीचे व्यावसायिक मुकेश अग्रवाल (Mukesh Agarwal) यांच्याशी विवाह केला होता; पण लग्नानंतर अवघ्या एका वर्षातच त्यांनी आत्महत्या केली. त्यावेळी रेखा याचं वय केवळ अवघं 35 होतं.

दाक्षिणात्य चित्रपटांमधून बॉलीवूडमध्ये आलेल्या शांतीप्रिया (Shantipriya) हिनं 1999मध्ये अभिनेता सिध्दार्थ रे (Siddharth Ray) याच्याशी लग्न केलं होतं; पण वयाच्या 40 व्या वर्षी सिध्दार्थचं निधन झालं. शांतीप्रियाचं वयही तेव्हा 35 वर्ष होतं. शांतीप्रियानं अक्षयकुमारबरोबर सौगंध चित्रपटात काम केलं होतं. अभिनेत्री आणि गायिका विजयता पंडीत (Vijayeta Pandit) हिनं 1990 मध्ये गायक आणि संगीत संयोजक आदेश श्रीवास्तव (Aadesh Shrivastava) यांच्याशी विवाह केला होता; पण 2015मध्ये आदेश श्रीवास्तव यांचं कॅन्सरनं निधन झालं. त्यांना अनिवेश आणि अवितेश अशी दोन मुलं आहेत.

अवश्य पाहा - अनुष्काची भविष्यवाणी ठरली खोटी; लग्नापूर्वीचा Video होतोय व्हायरल

आपल्या सौंदर्यानं बॉलीवूड गाजवणारी अभिनेत्री लीना चंदावरकर (Leena Chandavarkar) यांनी सुनील दत्त यांच्या मन का मीत या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला होता. यशाच्या शिखरावर असताना 1975 मध्ये त्यांनी सिद्धार्थ बांदोडकर यांच्याशी विवाह केला होता, पण काही दिवसातच बांदोडकर यांचा बंदुकीची गोळी लागून मृत्यू झाला. त्यानंतर लीना चंदावरकर यांनी प्रसिद्ध गायक, अभिनेते किशोरकुमार (Kishorkumar) यांच्याशी विवाह केला; मात्र लग्नानंतर अवघ्या सात वर्षात किशोरकुमार यांचा मृत्यू झाला. तेव्हा लीना चंदावरकर अवघ्या 37 वर्षांच्या होत्या.

अवश्य पाहा - सना खान पितेय सोन्याची कॉफी; किंमत पाहून तुम्ही देखील व्हाल थक्क

अनेक पंजाबी म्युझिक अल्बममध्ये काम करणारी अभिनेत्री कहकशा पटेल हिची कहाणी ही अशीच दुर्दैवी आहे. तिनं व्यावसायिक आरिफ पटेल यांच्याबरोबर लग्न केलं होतं; पण 2018 मध्ये आरिफ यांचा हृदयविकारानं मृत्यू झाला.

First published:

Tags: Bollywood actress, Bollywood News, Marathi entertainment, Marriage, Rekha