मुंबई 12 ऑगस्ट : छोट्या पडद्यावर मालिकांची टीआरपीसाठी (TRP) नेहमीच रस्सीखेच पाहायला मिळते. मालिकेचा टीआरपी वाढवण्यासाठी निर्माते नेहमीच नवनवीन शक्कल लढवत असतात. तर यावेळी बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री रेखा (Rekha) एका छोट्या पडद्यावरील मालिकेत झळकणार आहेत. नुकताच या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. ‘गुम हैं किसीके प्यार में’ (Ghum Hai Kisike Pyar Me) या मालिकेच्या प्रोमोत रेखा झळकल्या आहेत.
स्टार प्लस (Star plus) वाहिनीवरील ‘गुम हैं किसी के प्यार में’ मालिका नेहमीच चर्चेत राहते. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोत रेखा यांचा सुंदर अवतार पाहायला मिळत आहे. तर त्यांचा आवाजही प्रेक्षकांना फारच भावला आहे. पण या 60 सेकंदाच्या प्रोमोसाठी रेखा यांना मोठा आकडा मानधन म्हणून देण्यात आला आहे. (Rekha in Ghum Hai kisike pyar me)
View this post on Instagram
टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार रेखा यांनी ‘गुम हैं किसी के प्यार में’ मालिकेच्या 1 मिनिटाच्या प्रोमोसाठी 5 ते 7 कोटी रुपये दिले आहेत. सोशल मीडियावर मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. त्यातील रेखा यांचा अंदाज प्रेक्षकांना फारच आवडत आहे. सुंदर कांजीवरम साडी आणि ज्वेलरी परिधान करत त्यांचा सुंदर लुक पाहायला मिळत आहे.
रेखा अनेकदा टीव्ही वरील रिॲलिटी शोज मध्येही दिसतात. ‘इंडियन आइडल 12’ (Indian Idol12), आणि ‘डान्स दीवाने (Dance Deewane)’ या कार्यक्रमांमध्ये त्या दिसल्या होत्या. शो मधील स्पर्धकांशी त्यांनी धमाल केली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood actress, Entertainment, Rekha, Tv shows