VIDEO - केरला केरला डोंट वरी केरला, रेहमानच्या सुरांनी दिला धीर

VIDEO - केरला केरला डोंट वरी केरला, रेहमानच्या सुरांनी दिला धीर

संगीत हे सगळ्या वेदनांवर फुंकर घालण्याचं काम करतं त्यामुळे या कॉन्सर्टदरम्यान रेहमान यांनी त्यांच्या मुस्तफा मुस्तफा या गाण्याचे शब्द बदलून केरला केरला असे केले

  • Share this:

मुंबई, 23 आॅगस्ट : संगीतकार ए.आर.रेहमान यांच्या संगीताची भुरळ फक्त देशातीलच नाही तर परदेशातील नागरिकांवरही पडलीय. मात्र रेहमान यांच्या कॅलिफोर्नियामध्ये झालेल्या एका कॉन्सर्टदरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होतोय. संगीत हे सगळ्या वेदनांवर फुंकर घालण्याचं काम करतं त्यामुळे या कॉन्सर्टदरम्यान रेहमान यांनी त्यांच्या मुस्तफा मुस्तफा या गाण्याचे शब्द बदलून केरला केरला असे केले आणि त्यांच्या गाण्याला उपस्थित प्रेक्षकांनीही दाद दिलीय. या गाण्याद्वारे आपण केरळमधील पूरग्रस्तांसोबत असल्याचं त्यांनी दाखवून दिल्याने हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय.

केरळच्या नागरिकांना सध्या आर्थिक मदतीसोबतच मानसिक आधाराचीही गरज आहे. रेहमान यांनी आपल्या संगीताच्या माध्यमातून लोकांना तो आधार आणि ती प्रेरणा देण्याचा प्रयत्न केला आहे. कॅलिफोर्नियातील एका कॉन्सर्टदरम्यानचा त्यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये ते 'मुस्तफा, मुस्तफा' या गाण्याचे बोल बदलून 'केरला, केरला डोंट वरी केरला' असं गाणं गायलं. रेहमानच्या या अनोख्या संदेशाचं कौतुक नेटकरी करत आहेत.

केरळमध्ये आता पावसाचा जोर कमी झालाय. त्यामुळे मदतकार्याला वेग आलाय. पण सगळ्यात मोठी समस्या आहे ती रोगराई पसरण्याची. ठिकठिकाणी साचलेले चिखलाचे ढिगारे उपसणं आणि लोकांची घरं राहण्यालायक करणं हे एक मोठं आव्हान प्रशासनासमोर आहे. दूषित पाण्यामुळे होणारे रोग पसरू नयेत यासाठी ब्लिचिंग पावडर मुबलक प्रमाणात आवश्यक आहे. मदत छावण्यांमध्ये आवश्यक ती औषधं पुरवायला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत ९० अत्यावश्यक औषधं केरळमध्ये पोहोचली आहेत. पण पुराचा तडाखा बसलेली घरं पूर्ववत करणं आणि रोगाचा संसंर्ग होण्यापासून रोखणं ही दोन मोठी आव्हानं आहेत.

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी महाराष्ट्रातून डॉक्टरांचं एक पथक केरळमध्ये दाखल झालंय. या पथकासोबत मंत्री गिरीश महाजनही केरळला गेले होते. मदत नेमकी कुठे आणि कोणत्याप्रकारची हवी आहे, याबाबत महाजन केरळ सरकारशी समन्वय साधतील. महाराष्ट्रानं केरळला याआधीही मदतीचा हात दिला होता. राज्य सरकारनं केरळला २० कोटींची मदत जाहीर केली होती, तसंच साडे सहा टन अन्नधान्य विमानानं केरळला पाठवण्यात आलं होतं.

गेल्या १०० वर्षांतला केरळमधील हा सर्वात भीषण पूर असल्याचे मुख्यमंत्री पिनरयी विजयन यांनी म्हटले आहे. केरळ सरकारने केंद्र सरकारकडे अजून ११ हेलिकॉप्टरची मागणी केली आहे. दरम्यान, केरळमधील पुरस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी राज्याच्या पूरस्थितीची हवाई पाहणी केली. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याशी फोनवरुन बोलणे झाल्यावर केलेल्या ट्विटमध्ये मोदी यांनी म्हटले आहे की, केरळमधील स्थितीवर केंद्र सरकार सातत्याने लक्ष ठेवून आहे.

VIDEO : 'आधी खूप भीती वाटली,पण हिंमत केली'!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 23, 2018 09:29 AM IST

ताज्या बातम्या