मुंबई, 23 जानेवारी- हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री-दिग्दर्शक रेजिना किंगच्या(Regina King) एकुलत्या एका मुलाने (Ian Alexander Jr.) आत्महात्या केली आहे. इयानने बुधवारी २६ वा वाढदिवस साजरा केला होता. मात्र वाढदिवसाच्या दोन दिवसांतच त्याने आपलं आयुष्य संपवलं आहे. त्याच्या आशा जाण्यामुळं त्याच्या कुटुंबाला आणि मित्रांना धक्का बसला आहे. या कुटुंबाच्या प्रवक्त्याकडून या बातमीला दुजोरा देण्यात आला आहे. त्याने असं का केले, याबद्दल कोणतीच माहिती अद्याप समोर आलेली नाही.
रेजिना किंगच्या प्रवक्त्याकडून याबद्दल सांगण्यात आलं आहे की, इयानने आत्महत्या केल्याने रेजिनाच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. हे कसं घडलं आणि का घडलं हे त्यांच्या अद्याप लक्षात आलेले नाही. इयानच्या मृत्यूवर अनेक हॉलिवूड सेलेब्सनी दु:ख व्यक्त केले आहे. रेजिनासाठी देखील दु:ख व्यक्त करत या सगळ्यात आम्ही तुझ्यासोबत असल्याचे देखील म्हटलं आहे.
वाचा-शाहरूखच्या देशातली आहेस म्हणून... एकाने केली मदत ! SRK ने दिलं गिफ्ट
रेजिनानेही आपल्या मुलाच्या मृत्यूच्या बातमीला दुजोरा दिला आहे. रेजिना किंग म्हणाली की, 'तो एका चमकत्या ताऱ्यासारखा होता. त्याला इतरांच्या सुखाची पर्वा होती.यानंतर या वाईट काळात त्याने एकटाने वेळ घालावण्यासंबंधी देखील तो बोलला होता. तसेच ती पुढे म्हणाली की, या वाईट काळात आम्हाला सन्मानाने जगण्याती परवानगी द्या अशी आमच्या कुटुंबाची इच्छा आहे.
बुधवारी इयानने एक अजीब पोस्ट शेअर केली होती. ही पोस्ट पाहून त्याच्या मृत्यूमागे हे कारण असू शकते असा अंदाज लावू शकतो. इयान अलेक्झांडर जूनियर हा रेजिनाचा एकुलता एक मुलगा होता. ज्याने बुधवारीच आपला 26 वा वाढदिवस साजरा केला. रेजिना ही एक प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री आणि दिग्दर्शक आहे. तिला ऑस्कर या प्रतिष्ठेच्या सन्मानानेही गौरविण्यात आले आहे. तिच्या मुलाच्या निधनावर हॉलिवूड इंडस्ट्रीने दु: ख व्यक्त केले आहे.
Published by:News18 Trending Desk
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.