मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Reena Roy: रीना रॉय यांना ओळखणंही झालं कठीण;लेटेस्ट व्हिडीओ पाहून सर्वच थक्क

Reena Roy: रीना रॉय यांना ओळखणंही झालं कठीण;लेटेस्ट व्हिडीओ पाहून सर्वच थक्क

'रीना रॉय' हे नाव हिंदी चित्रपटसृष्टीत फार मोठं आहे. 1970 आणि 80 च्या दशकात अनेक चित्रपटांमध्ये काम केलेल्या या ज्येष्ठ अभिनेत्री गेल्या अनेक वर्षांपासून पडद्यापासून दूर आहेत.

'रीना रॉय' हे नाव हिंदी चित्रपटसृष्टीत फार मोठं आहे. 1970 आणि 80 च्या दशकात अनेक चित्रपटांमध्ये काम केलेल्या या ज्येष्ठ अभिनेत्री गेल्या अनेक वर्षांपासून पडद्यापासून दूर आहेत.

'रीना रॉय' हे नाव हिंदी चित्रपटसृष्टीत फार मोठं आहे. 1970 आणि 80 च्या दशकात अनेक चित्रपटांमध्ये काम केलेल्या या ज्येष्ठ अभिनेत्री गेल्या अनेक वर्षांपासून पडद्यापासून दूर आहेत.

  मुंबई, 18 ऑगस्ट-  रीना रॉय हे नाव हिंदी  चित्रपटसृष्टीतील फार मोठं आहे. 1970 आणि 80 च्या दशकात अनेक चित्रपटांमध्ये काम केलेल्या या ज्येष्ठ अभिनेत्री गेल्या अनेक वर्षांपासून पडद्यापासून दूर आहेत. फक्त पडद्यावरच नव्हे तर रीना यांना अनेक वर्षांपासून कोणत्याही कार्यक्रमात किंवा टीव्ही शोमध्ये प्रेक्षकांनी पाहिलेलंच नाहीय. पण बऱ्याच काळानंतर रीना रॉय आता टीव्हीवर एका रिअॅलिटी शोमध्ये दिसणार आहे. 'सुपरस्टार सिंगर 2' च्या आगामी भागात रीना रॉय खास पाहुणी म्हणून उपस्थिती लावणार आहेत. अभिनेत्री रीना आपल्या एका सदाबहार गाण्यावर नृत्य करत शोमध्ये धमाकेदार एन्ट्री घेणार आहेत. नुकतंच त्यांची पहिली झलक समोर आली आहे. परंतु अनेक वर्षांनंतर अभिनेत्रीची झलक पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. त्यांच्यामध्ये प्रचंड बदल दिसून येत आहे. परंतु आजही त्यांचा उत्साह जसाच्या तसा आहे. सोनी वाहिनीने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर आगामी भागाचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये रीना स्पर्धकांचं कौतुक करताना आणि डान्स करताना दिसून येत आहे. या एपिसोडमध्ये सर्व स्पर्धक अभिनेत्रीला ट्रिब्यूट देताना आणि त्यांच्या चित्रपटांचे डायलॉग बोलताना दिसणार आहेत. इतकंच नव्हे तर या एपिसोडमध्ये रीना रॉय स्वतः शत्रुघ्न सिन्हा यांचा प्रसिद्ध डायलॉग 'जली को आग कहते हैं, बुझी कोराख कहते हैं...' म्हणत असल्याचं दिसत आहे.हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. शिवाय रीना यांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांमध्ये हवा केली आहे.
  (हे वाचा: Shweta Rastogi: 'श्रीकृष्ण' मालिकेतील 'राधा' आता दिसतेय अशी; समोर आले लेटेस्ट फोटो) रीना रॉय 70 - 80 च्या दशकात प्रचंड लोकप्रिय होत्या. त्याकाळच्या टॉपच्या अभिनेत्रींमध्ये त्यांची गणना केली जात होती. आजही त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. आपल्या अभिनय आणि सौंदर्याने त्यांनी प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं होतं. त्यांनी कालीचरण, नागिन, जैसे को तैसा, जख्मी आणि सनम तेरी कसम सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अभिनेता शत्रुघन सिन्हा यांच्यासोबत त्यांची जोडी चांगलीच गाजली होती. खऱ्या आयुष्यातसुद्धा या दोघांचं एकमेकांवर प्रेम असल्याचं म्हटलं जात होतं. त्यांची लव्हस्टोरी आजही प्रेक्षकांना तितक्याच उत्सुकतेने ऐकायला आवडते. 1983 मध्ये रीना यांनी क्रिकेटर मोहसीन खानसोबत लग्न केलं होतं. त्यानंतर त्यांनी चित्रपटांपासून दूर राहणं पसंत केलं होतं. पण 1992 मध्ये मोहसिन खान यांच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर रीना 1993 मध्ये पुन्हा चित्रपटांमध्ये परतल्या होत्या.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Bollywood actress, Bollywood News, Entertainment

  पुढील बातम्या