रीमा लागू यांचा अल्पपरिचय

रीमा लागू यांचा अल्पपरिचय

 • Share this:

18 मे : कणखर अभिनयाने सिनेसृष्टीत वेगळेपण जपणारी हरहुन्नरी अभिनेत्री रीमा लागू काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण सिनेसृष्टीला धक्का बसला आहे.

रीमाताईंनी आपल्या कसदार अभिनयाच्या जोरावर अनेक व्यक्तिरेखा जिवंत केल्या होत्या. मोठा पडदा असो की रंगभूमी अत्यंत सहजपणे त्या आपली भूमिका साकारायच्या.

राजश्री प्रॉडक्शनच्या बहुतेक चित्रपटांमध्ये त्यांनी हिरोच्या आईचं काम केलं होतं. अनेक हिंदी चित्रपटांमधून त्यांनी साकारलेली ‘आई’ आजही सिनेप्रेमींच्या अगदी लख्खपणे लक्षात आहे. विशेषतः सलमान खानची प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटांमधून त्यांनी साकारलेली ‘आई’ विशेष गाजली होती. रीमा यांच्या अचानक जाण्याने चित्रपट आणि टेलिव्हिजन क्षेत्रातील आई हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

अल्प परिचय

 • रीमा लागू यांचा जन्म 3 फेब्रुवारी 1958 मध्ये झाला.
 • मूळ नाव नयन भडभडे
 • मंदाकिनी भडभडेंची मुलगी
 • घरातूनचं अभिनयाचा वारसा
 • मंदाकिनी भडभडे यांचं ‘लेकुरे उदंड जाहले’ हे नाटक प्रचंड गाजलं होतं.
 • रीमा लागू यांचं पुण्यात शालेय शिक्षण सुरु होतं, त्याचवेळी त्यांना अभिनयाचे धडेही देण्यात आले.
 • माध्यमिक शिक्षणानंतर त्यांनी अभिनयाचे व्यावसायिक शिक्षण घेतलं.
 • त्यानंतर मराठी रंगभूमीवरुन त्यांनी अभिनयाच्या क्षेत्रात पाय ठेवला.
 • विवेक लागू यांच्याशी विवाहबद्ध झाल्यानंतर नयन भडभडे या रीमा लागू म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. मात्र काही वर्षानंतर दोघेही वेगवेगळे झाले.
 • मृण्मयी लागू या रीमा लागू यांच्या कन्या. त्या स्वत:ही नाट्य, सिनेअभिनेत्री आहेत.

रीमा लागू यांची सुरुवात

 • कलयुग हा पहिला हिंदी सिनेमा
 • अनेक बहुरंगी-बहुढंगी भूमिका
 • ताकदीची मराठी चित्रपट आणि रंगभूमीवरची अभिनेत्री
 • युनियन बँकेत 9 वर्ष नोकरी
 • राजश्री प्रॉडक्शनच्या बहुतेक चित्रपटांमध्ये काम
 • हिंदीतली सर्वात ग्लॅमरस आई
 • थिएटरची कारकीर्दही वादळी
 • चार वेळा नॅशनल अवॉर्डला हुलकावणी
 • व्ही शांताराम पुरस्कारानं सन्मानित

गाजलेली नाटकं

 • छापा काटा
 • घर तिघांचं हवं
 • चल आटप लवकर
 • झाले मोकळे आकाश
 • तो एक क्षण
 • पुरुष
 • बुलंद
 • सविता दामोदर परांजपे
 • विठो रखुमाय

गाजलेले हिंदी चित्रपट

 • मैंने प्यार किया
 • हम आपके है कौन
 • हम साथ साथ है
 • वास्तव
 • साजन
 • कुछ कुछ होता है
 • मै प्रेम की दीवानी हू
 • आशिकी
 • कयामत से कयामत तक
 • रंगीला
 • जिस देश मे गंगा रहता है

गाजलेल्या मालिका

 • खानदान
 • श्रीमान श्रीमती
 • तू तू मै मै
 • तुझं माझं जमेना
 • दो हंसोका जोडा
 • कडवी खट्टीमिठ्ठी

रीमा लागू यांना अनेक पुरस्कार

 • 1990 रोजी - मैने प्यार किया - फिल्मफेअर - सर्वोकृष्ट सहाय्यक अभिनेत्री
 • 1991 रोजी - आशिकी - फिल्मफेअर- सर्वोकृष्ट सहाय्यक अभिनेत्री
 • 1995 रोजी - हम आपके है कौन -फिल्मफेअर- सर्वोकृष्ट सहाय्यक अभिनेत्री
 • 2000 रोजी - वास्तव -फिल्मफेअर- सर्वोकृष्ट सहाय्यक अभिनेत्री

स्टार्स मॉम

 • 'कुछ कुछ होता है'मध्ये काजोलची आई
 • 'हम आपके है कौन'मध्ये माधुरी दीक्षितची आई
 • 'वास्तव'मध्ये संजय दत्तची आई
 • 'मैने प्यार किया'मध्ये सलमान खानची आई
 • 'मै प्रेम की दिवानी हू'मध्ये अभिषेक बच्चनची आई
 • 'कल हो ना हो'मध्ये शाहरूख खानची आई

First published: May 18, 2017, 9:52 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading