मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

लग्नानंतर दीपिकाच्या या सवयीला वैतागला आहे रणवीर, आई सुद्धा समजावून थकली

लग्नानंतर दीपिकाच्या या सवयीला वैतागला आहे रणवीर, आई सुद्धा समजावून थकली

दीपिकाच्या या सवयीनं रणवीरची डोकेदुखी इतकी वाढली की त्यानं सरळ फॅमिलीच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरच तिची तक्रार करुन टाकली आहे.

दीपिकाच्या या सवयीनं रणवीरची डोकेदुखी इतकी वाढली की त्यानं सरळ फॅमिलीच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरच तिची तक्रार करुन टाकली आहे.

दीपिकाच्या या सवयीनं रणवीरची डोकेदुखी इतकी वाढली की त्यानं सरळ फॅमिलीच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरच तिची तक्रार करुन टाकली आहे.

  • Published by:  Megha Jethe
मुंबई, 08 एप्रिल : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण हे सध्या बी-टाऊनमधलं सर्वाधिक चर्चेत राहणारं कपल आहे. लॉकडाउनच्या काळातही हे कपल सोशल मीडियावरुन चाहत्यांशी संवाद साधताना दिसत आहे. आपले वेगवेगळे फोटो शेअर करत आहे. एकमेकांच्या फोटोवर कमेंट करत आहेत. एकंदर काय तर दोघंही मॅरिड लाइफचा आनंद घेताना दिसत आहेत. पण सध्या रणवीर सिंह मात्र दीपिकाच्या एका सवयीला प्रचंड वैतागला आहे. तिच्या या सवयीनं त्याची डोकेदुखी इतकी वाढली की त्यानं सरळ फॅमिलीच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरच तिची तक्रार करुन टाकली आहे. नुकत्याच एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत दीपिकानं स्वतःच याविषयीचा खुलासा केला केला आहे. दीपिका म्हणाली, माझ्या सतत काही ना काही करत राहण्याच्या सवयीचा रणवीरला खूप वैताग आला आहे आणि त्यानं माझी तक्रार फॅमिली ग्रुपमध्येही करुन टाकली आहे. घरी मेड येत नसल्यानं घरातलं सर्व काम सध्या स्वतःच करावं लागत आहे. अशात साफ-सफाई करत असताना एक दिवस माझी पाठ दुखायला लागली होती. तेव्हाही मी आराम केला नाही. त्यावरुन रणवीरला राग आला आणि त्यानं माझी तक्रार केली.
View this post on Instagram

#9pm9minutes

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

दीपिका पुढे म्हणाली, जेव्हा काम करताना माझी पाठ दुखयला लागली ते पाहून रणवीर मला म्हणाला की, तू आता आराम कर आणि तुझ्या जागेवरुन अजिबात हलू नकोस. तो व्यायाम करायला निघून गेला. 20 मिनिटांनी जेव्हा तो परत आला तेव्हा मी पुन्हा सफाई करत होते. हे पाहून त्याला खूप राग आला आणि तो म्हणाला, प्रत्येक वेळी हे असं करण गरजेच आहे. तू एका जागी शांत बसू शकत नाही का? आणि त्यानं माझ्या या वागण्याची फॅमिलीकडे तक्रार केली.
दीपिका सांगते, मला सतत काही ना काही करत राहण्याची सवय आहे. मी एका जागी जास्त वेळ बसू शकत नाही. माझ्या आईनं अनेकदा मला समजावलं आता ती सुद्धा मला सांगून थकली आहे. पण माझी सवय सुटत नाही. मी नेहमीच काही ना काही करत राहते. अशी कोणतीच वेळ नसते जेव्हा माझ्याकडे करण्यासाठी काही नसतं.
लॉकडाउनच्या काळात दीपिका पती रणवीर सिंहला स्वतःच्या हातांनी वेगवेगळे पदार्थ बनवून खायला घालत आहे. काही दिवसांपूर्वी रणवीरनं याचे फोटो त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. याशिवाय दीपिका सुद्धा तिच्या इन्स्टाग्रामवर रोज काही ना काही शेअर करताना दिसत आहे. (संपादन : मेघा जेठे.)
First published:

Tags: Bollywood, Deepika padukone

पुढील बातम्या