ऋषी कपूरचा म्युझिकल 'कर्ज' पुन्हा रिलीज

ऋषी कपूरचा म्युझिकल 'कर्ज' पुन्हा रिलीज

सुभाष घई त्यांचे सिनेमे पुन्हा रिलीज करतायत. त्यात 'ताल'नंतर नंबर लागलाय 'कर्ज'चा.

  • Share this:

24 एप्रिल : क्या तुमने कभी किसी से प्यार किया... म्हणत ऋषी कपूरनं अनेक जणींच्या हृदयावर  राज्य केलं. आणि आता सुभाष घई त्यांचे सिनेमे पुन्हा रिलीज करतायत. त्यात 'ताल'नंतर नंबर लागलाय 'कर्ज'चा.

कर्ज पुन्हा रिलीज होतोय. त्याच्या प्रीमियरला ऋषी कपूरनं सगळ्यांशी संवाद साधला. कर्ज रिलीज झाला, तेव्हा कुठलाही रोमँटिक सिनेमा फारसा चालायचा नाही. त्यावेळी दौर होता अॅक्शन फिल्मचा.  पण पहिल्या आठवड्यात कर्ज लोकांच्या पसंतीस उतरला होता.

ऋषी कपूर सांगतात, ' पुढच्या आठवड्यात फिरोज खानचा कुर्बानी रिलीज झाला. आणि तो सुपरहिट ठरला. मग कर्ज रेसच्या बाहेरच फेकला गेला. '

पुढे ते असंही  म्हणाले की आज 37 वर्षांनी मी कर्जवर बोलतोय, हेच या सिनेमाचं यश.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 24, 2017 05:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading