Home /News /entertainment /

...म्हणून आर.डी बर्मन यांना मिळालं ‘पंचम दा’ हे नाव; वयाच्या 9व्या वर्षी पहिलं गाणं केलं संगीतबद्ध

...म्हणून आर.डी बर्मन यांना मिळालं ‘पंचम दा’ हे नाव; वयाच्या 9व्या वर्षी पहिलं गाणं केलं संगीतबद्ध

आर.डी बर्मन (R.D.Burman) यांना 'पंचम दा' हे नाव कसं मिळालं याचा किस्सा अतिशय रंजक आहे... बॉलिवूडच्या या श्रेष्ठ संगीतकाराचं 4 जानेवारी, 1994 रोजी निधन झालं होतं.

    मुंबई, 04 जानेवारी : बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये 70 चं युग म्हणजे गोल्डन इरा मानला जातो. या दशकातील चित्रपट, अभिनेते आणि गाणीदेखील भन्नाट होती. 70 च्या दशकातील गाणी आजही लोकांच्या हृदयात आहेत. या दशकात बॉलीवूडमध्ये सर्वाधिक नाव मिळवणारे संगीत दिग्दर्शक होते आरडी बर्मन (R.D.Burman). 70 च्या दशकात त्यांचं गाणं म्हणजे हिट होणारच असं समीकरण बनलं. आर. डी बर्मन यांचे आजही अनेक चाहते आहेत. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त जाणून घेऊया त्याच्या आयुष्यातील काही खास घटना. आरडी बर्मन यांचे वडील एसडी बर्मन एक महान संगीतकार होते. त्यांनी आपल्या कारकीर्दीत बरंच नाव कमावलं होतं. त्यामुळे आरडी बर्मन यांना घरातूनच संगीताचं बाळकडू मिळालं होतं. आरडींनी वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी पहिलं गाणं संगीतबद्ध केलं होतं. आणि बॉलिवूडमध्ये अवघ्या 17 व्या वर्षी पाऊल टाकलं होतं. आर.डी बर्मन यांना 'पंचम दा' हे नाव कसं मिळालं याचा किस्सा अतिशय रंजक आहे. असं म्हणतात की, ‘आर. डी बर्मन जेव्हा लहान होते तेव्हा ते 5 व्या नोटवर रडायचे त्यामुळे त्यांचं नाव पंचम ठेवण्यात आलं.’ अजूनही एक किस्सा सांगितला जातो, तो असा की, ‘पंचम दा जेव्हा अशोक कुमार यांना कामानिमित्त पहिल्यांदा भेटले तेव्हा ते सारखे ‘प’ या शब्दाचा उच्चार करत होते त्यामुळे अशोक कुमार यांनी त्यांचं नाव पंचम दा असं ठेवलं.’ पंचम दा यांची गाणी आजही आपल्याला सुखावून जातात. त्यांनी तिसरी मंजिल, अमर प्रेम, आंधी, परिचय, मासूम, शोले, खेल खेल में, आप की कसम, किनारा आणि 1942 लव स्टोरी अशा सिनेमातील गाण्यांना संगीतबद्ध केलं आहे. बॉलिवूडमधील या जेष्ठ आणि श्रेष्ठ संगीतकाराचं 4 जानेवारी, 1994 रोजी निधन झालं होतं.
    Published by:Amruta Abhyankar
    First published:

    Tags: Bollywood

    पुढील बातम्या