रवी जाधवच्या 'न्यूड' सिनेमाचं पोस्टर माॅडेल्सना समर्पित

रवी जाधवच्या 'न्यूड' सिनेमाचं पोस्टर माॅडेल्सना समर्पित

रवी जाधवच्या बहुचर्चित 'न्यूड' या सिनेमाचं पहिलं पोस्टर त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून रिलीज केलंय.हा सिनेमा कला महाविद्यालयांमध्ये न्यूड मॉडलिंग करणाऱ्या मॉडेल्सच्या आयुष्यावर आधारित आहे.

  • Share this:

28 आॅक्टोबर : रवी जाधवच्या बहुचर्चित 'न्यूड' या सिनेमाचं पहिलं पोस्टर त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून रिलीज केलंय.हा सिनेमा कला महाविद्यालयांमध्ये न्यूड मॉडलिंग करणाऱ्या मॉडेल्सच्या आयुष्यावर आधारित आहे. सिनेमात कल्याणी मुळे आणि छाया कदम या मुख्य भूमिकेत आहेत, तर नसिरूद्दीन शहा हेही या सिनेमात एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणारेत.

या सिनेमाचं टिझर फास्टर फेणे या सिनेमासोबत आज रिलीज करण्यात आलंय. सोशल मीडियावर मात्र अजून या सिनेमाचं पोस्टरचं शेअर केलं गेलंय.

रवीने त्याच्या आगामी चित्रपटाचा पोस्टर शेअर करत त्यासोबत कॅप्शनही दिले आहे. ‘आपले विवस्त्र शरीर आणि आत्मा सर्वांसमोर आणणाऱ्या जगाच्या कानाकोपऱ्यातील त्या प्रत्येक न्यूड मॉडेलसाठी हा चित्रपट समर्पित आहे’, असे त्याने या पोस्टमध्ये लिहिले.

First published: October 28, 2017, 1:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading