मुंबई, 11 जुलै : अभिनेता अक्षय कुमारच्या 'हाऊसफुल्ल 4' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही प्रमाणात हिट ठरला होता. मात्र विशेष प्रसिद्धी मिळवली ती या चित्रपटातील 'बाला' या गाण्याने. सोशल मीडियावर हे गाणे तुफान व्हायरल झाले होते. अक्षय कुमारने देखील चित्रपटच्या प्रमोशनवेळी अनेक व्हिडीओ पोस्ट केले होते. मात्र चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या इतक्या दिवसानंतरही या गाण्याची क्रेझ कमी झाली नाही आहे. टेलिव्हिजन अभिनेता रवी दुबे याने सोशल मीडियावर त्याच्या भाच्याच्या एक व्हिडीओ शेअर केल आहे. यामध्ये तो मोबाइलमध्ये 'बाला' हे गाणे पाहतो आहे. रवीच्या भाच्याला या गाण्याचे इतर बोल जरी आठवत नसले तरी 'बाला' हा शब्द मोठमोठ्याने ओरडून म्हणत आहे. हा व्हिडीओ शूट करताना रवीला देखील हसू आवरले नाही आहे.
दरम्यान रवी दुबेने हा व्हिडीओ त्याच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. यामध्ये त्याने अभिनेता अक्षय कुमारला देखील टॅग केले आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्याने असे कॅप्शन दिले आहे की, 'माझा छोट्यासा भाचा अक्षय कुमार सरांचा मोठा फॅन आहे'.
my tiny nephew is a biig fan of @akshaykumar sir Balaaaaaaaaaaa❤️ pic.twitter.com/T30x00Ndj6
— Ravi Dubey 1 (@_ravidubey) July 7, 2020
दरम्यान विशेष म्हणजे खिलाडी कुमारला देखील हा व्हिडीओ प्रचंड आवडला आहे. त्याने रवीच्या व्हिडीओवर कमेंट करत रिट्वीट केला आहे. 'त्याने एकदम योग्य लिरिक्स म्हटले आहेत, खूप गोंडस', अशी कॅप्शन देत अक्षयने हा व्हिडीओ रिट्वीट केला आहे.
He’s got the lyrics bang on 😂 Too cute ♥️ https://t.co/EtAcsxJ1Bu
— Akshay Kumar (@akshaykumar) July 7, 2020
'हाऊसफुल्ल 4'च्या प्रमोशनादरम्यान बाला हे गाणे विशेष प्रसिद्ध झाले होते. त्यावेळी या गाण्यावरून 'बाला चॅलेंज' इन्स्टाग्रामवर व्हायरल झाले होते. मोठमोठ्या बॉलिवूड कलाकारांनी देखील हे चॅलेंज स्विकारत त्यांचे व्हिडीओ पोस्ट केले होते.