मुंबई, 2 मार्च : सध्या लग्नसराईचे दिवस सुरू आहेत मग यामध्ये सेलिब्रिटी सुद्धा मागे राहत नाही आहे. कुटुंबीयांच्या लग्नामध्ये अनेक सेलिब्रिटी हजेरी लावत आहेत. रवीना टंडन सुद्धा तिच्या भाचीच्या लग्नामध्ये मिरवताना दिसली. पण या लग्नातील मेहंदी सोहळ्याला पोहोचण्यासाठी तिला खूप संघर्ष करावा लागलेला दिसतोय. रवीना टंडन आपल्या भाचीच्या लग्नातील मेहंदीच्या कार्यक्रमासाठी नटून थटून निघाली खरी, पण मुंबईतील ट्रॅफिक टाळण्यासाठी तिने चक्क कारचा नाही तर रिक्षाचा वापर केला. यावेळी तिची मुलगीसुद्धा तिच्याबरोबर होती. लग्नात जाण्यासाठी तिला रिक्षाचा सहारा का घ्यावा लागला हे रविनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सांगितलं आहे.
मेहंदीसाठी रिक्षाने पोहोचण्याबाबत रवीनाने 2 व्हिडीओ अपलोड केले आहेत. त्यातील एका व्हिडीओमध्ये ती ऑटोत बसली आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे की, 'मी पटकन ऑटोमध्ये बसले, कारण कारची वाट पाहत बसले तर माझ्या भाचीच्या मेहंदी सोहळ्यासाठी उशीर होईल. मुंबईचे रिक्षावाले खरंच सेव्हियर्स आहेत.’ ऑटोमध्ये बसून व्हिडीओ शूट केला आहे.
रवीनाने पोस्ट केलेल्या दुसऱ्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की यातील ‘ऑटोवाले चाचा’ रवीनाचे फॅन निघाले. रवीना या चाचांशी गप्पा मारताना दिसली. या चाचांचं नाव अर्शद असून त्यांनी रवीनाचे खूप चित्रपट पाहिल्याचं ते सांगतात. रवीना देखील त्यांना भेटून आनंद झाल्याचं सांगत आहे. रवीनाने या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'ज्यांनी मला विचारले की ते मला ओळखू शकले का, त्यांच्यासाठी. अर्शद चाचा फॅन आहेत. तिथून जाण्याआधी त्यांच्याबरोबर खूप गप्पा मारल्या'.
त्याचबरोबर रवीनाने लग्नाचे फोटोही तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. यामध्ये अशी काही छायाचित्रे आहेत ज्यात ती तिचा पती अनिल थडानीसोबतही दिसली आहे.
या फोटोमध्ये रवीना हिरव्या रंगाच्या लेहंग्यामध्ये दिसली. तिचा पारपंरिक लूक चाहत्यांना खूप आवडला आहे.