मुंबई, 30 नोव्हेंबर : बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती सोशल मीडियावर शूटिंग दरम्यानचे तिचे फोटो आणि व्हिडीओ तसेच प्रवासाचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. मात्र आता याच मुळे ती अडचणीत सापडली आहे. रवीना टंडन सध्या वाघाच्या फोटोशूटमूळे चांगलीच चर्चेत आली आणि त्यामुळे तिच्या अडचणीही वाढल्या आहेत. नुकतचं तिनं वाघाचा एक व्हिडीओ आपल्या सोशल मीडियावर शेअर केला होता. त्याचबरोबर रवीनाने तिच्या सोशल मीडिया हँडलवर सातपुडा व्याघ्र प्रकल्पाच्या प्रवासाचे फोटो शेअर केले आहेत. तिने वाघांचे काही फोटो आणि व्हिडीओ देखील शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती वाघाच्या जवळ जाताना दिसत आहे. आता या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
रवीना टंडनने वाघ आणि त्याच्या बछड्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. मात्र या व्हिडिओमूळेच तिच्या अडचणी वाढल्या आहेत. पीटीआयच्या वृत्तानुसार, वन उपविभागीय अधिकारी (एसडीओ) धीरज सिंह चौहान यांनी वरिष्ठ अधिकार्यांच्या सूचनेनंतर या व्हिडीओची आणि चालक आणि तेथे ड्युटीवर असलेल्या अधिकाऱ्यांना नोटीस देऊन त्यांची चौकशी करण्यात येणार असल्याचेही सांगितले.
रवीना टंडन सध्या मध्य प्रदेशमध्ये शूटिंग करत आहे. तिने तिच्या भोपाळमधील शुटिंगदरम्यानचे मजेदार क्षण सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 22 नोव्हेंबर रोजी तिने भोपाळजवळील नर्मदापुरम जिल्ह्यातील सातपुडा व्याघ्र प्रकल्पाची सफारी केली. तिच्यासोबत तयावेळी वनविभागाने दिलेले प्रशिक्षित मार्गदर्शक आणि चालक देखील होते. खरंतर, रवीनाने जीपचा एक व्हिडिओ ट्वीट केला आहे. ज्यामध्ये ती वाघाच्या जवळ जाताना दिसत आहे. कॅमेऱ्याच्या शटरचा आवाज क्लिपमध्ये ऐकू येतो आणि राखीव भागात एक वाघ त्यांच्याकडे ओरडताना ऐकू येतो. तिच्या या व्हिडिओनंतरच सोशल मीडियावर गोंधळ सुरु झाला.
Got beautiful shots of sharmilee and her cubs in Tadoba. Wildlife shots are unpredictable due to the unreadable nature of our https://t.co/JQSB9ylxlO tries to be as silent and capture the best moments. Video Shot on Sony Zoom lense 200/400. pic.twitter.com/LsUOn2XtYs
— Raveena Tandon (@TandonRaveena) November 29, 2022
आता या प्रकरणानंतर आता रविना टंडनने या सर्व प्रकरणावर स्पष्टीकरण दिल आहे. याबाबत एक ट्विट पोस्ट करत तिने याबाबत स्पष्टीकरण दिलंयं. यात ती म्हणतेय की, "काही वृत्तवाहिन्यांनी दाखवलं की आम्ही वाघिणीच्या जवळ गेलो. मात्र आम्ही वनविभागाच्या परवानाधारक गाईड आणि गाडीतून तिथे गेलो होतो. त्यांना सगळ्या सीमा माहित असतात . वाघ त्याच्या परिसरात राजासारखा फिरत असतो. आपण केवळ तिथे मूकप्रेक्षक असतो.''
तिने पुढे म्हटंलय की, ''आपली एखादीही अचानक केलेली हलचाल त्यांना विचलित करु शकते .सुदैवाने आम्ही अशी काही हलचाल केली नाही. आम्ही तिच्या वाटेला गलो नाही फक्त तिला शांतपणे पाहत राहिलो. यापुर्वीही केटी वाघिणीच्या वाहनांजवळ येण्याच्या घटना घडल्या आहेत." आता तिने दिलेलं स्पष्टिकरण एकल्यानंतर वनविभाग काय कारवाई करेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood actress, Entertainment