मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

पालघर मॉब लिंचिंग प्रकरण : मृत ड्रायव्हरच्या कुटुंबीयांसाठी रवीना टंडननं केलं मदतीचं आवाहन

पालघर मॉब लिंचिंग प्रकरण : मृत ड्रायव्हरच्या कुटुंबीयांसाठी रवीना टंडननं केलं मदतीचं आवाहन

काही दिवसांपूर्वी पालघर जिल्ह्यात घडलेल्या मॉब लिंचिंगच्या घटनेनं संपूर्ण देश हादरुन निघाला होता. सगळीकडून या घटनेचा निषेध करण्यात येत आहे.

काही दिवसांपूर्वी पालघर जिल्ह्यात घडलेल्या मॉब लिंचिंगच्या घटनेनं संपूर्ण देश हादरुन निघाला होता. सगळीकडून या घटनेचा निषेध करण्यात येत आहे.

काही दिवसांपूर्वी पालघर जिल्ह्यात घडलेल्या मॉब लिंचिंगच्या घटनेनं संपूर्ण देश हादरुन निघाला होता. सगळीकडून या घटनेचा निषेध करण्यात येत आहे.

  • Published by:  Megha Jethe
मुंबई, 26 एप्रिल : काही दिवसांपूर्वी पालघर जिल्ह्यात घडलेल्या मॉब लिंचिंगच्या घटनेनं संपूर्ण देश हादरुन निघाला होता. याचे पदसाद देशाच्या कानाकोपऱ्यातून उमटलेले दिसून आले. सगळीकडून या घटनेचा निषेध करण्यात येत आहे. यामध्येच काही कलाकारांचाही समावेश आहे. मराठी सिनेसृष्टीपासून ते बॉलिवूडपर्यंत अनेकांनी या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. पण आता याप्रकरणी अभिनेत्री रवीना टंडन व्यक्त प्रतिक्रिया दिली असून, या घटनेत मृत्यू झालेल्या गाडी चालकाच्या कुटुंबीयांना मदत करण्याचं आवाहन सोशल मीडियाद्वारे केलं आहे. रवीना टंडन अनेकदा समाजात घडणाऱ्या घटनांवर व्यक्त होताना दिसते. प्रत्येक वेळी ती बिनधास्तपणे कोणत्याही विषयावर आपलं मत मांडत असते. आता पालघर जिल्ह्यातील मॉब लिंचिंगप्रकरणावरही तिनं आपली प्रतिक्रिया दिली आहे. तिने एका वेबसाईटची लिंक ट्विट केली आहे. यात तिने हल्ल्यात मृत पावलेल्या ड्रायव्हरच्या कुटुंबीयांना मदत करण्याचं आवाहन केलं आहे. लॉकडाऊनमध्ये करण जोहरचे झाले असे हाल, ओळखूही येणार नाही असा फोटो VIRAL रवीनानं तिच्या पोस्टमध्ये लिहिलं, 'लॉकडाउनच्या काळात पालघरमध्ये तीन जणांचा मॉब लिंचिंग दरम्यान मृत्यू झाला. यात 29 वर्षीय ड्रायव्हरचाही समावेश होतो. या ड्रायव्हरच्या मागे त्याचे कुटुंबीय आहेत. त्याला दोन लहान मुली आहेत. त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे. ज्याला जसं शक्य होईल त्यांनी कृपया या कुटुंबाला मदत करा' बिकिनी ते अगदी फक्त उशीचा ड्रेस,लॉकडाऊनमध्ये सेलिब्रिटींचे PHOTO इंटरनेटवर हिट
View this post on Instagram

#♥️🙏🏻thankyou #medicalcommunity ♥️🙏🏻 I nominate @sonu_sood @theshilpashetty @thejohnabraham Friends,As we come together to fight the challenges posed by the Coronavirus Pandemic,I would like you to think of all those doctors, nurses and health-workers, quietly working with diligence and dignity,away from their homes and families,so that our present and future remains secure. Lately we have all heard unfortunate reports of our healthcare workers being harassed and attacked.This is a tragic happening we must all confront together. Please do not fall prey to fake news and false rumours, which may fuel violence against our medical community. The least we can do is to protect those who are doing everything to keep us safe and the one thing we owe them is a debt of gratitude.Thank you and stay safe!

A post shared by Raveena Tandon (@officialraveenatandon) on

दरम्यान, सध्या या काळात अनेक अफवा पसरत आहेत. त्यामुळे या अफवा रोखण्यासाठी रवीनाने एक अभियानही सुरु केलं आहे. #jitegaIndiajitengehum असं तिच्या अभियानाचं नाव आहे. (संपादन- मेघा जेठे.) भूमि पेडणेकर लॉकडाऊनमध्ये करतेय शेती, PHOTOS पाहून बसणार नाही विश्वास
First published:

Tags: Bollywood, Raveena tandon

पुढील बातम्या