छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा सुरू होतोय घाबरवणारा 'खेळ'

छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा सुरू होतोय घाबरवणारा 'खेळ'

माझ्या नवऱ्याची बायको, तुला पाहते रे, स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकांचा टीआरपी नेहमीच वर असतो. आता पुढच्या वर्षी यात आणखी भर पडणार आहे एका मालिकेची.

  • Share this:

मुंबई, 10 डिसेंबर : नेहमीच टीआरपी रेटिंगमध्ये झी मराठीच पहिल्या पाचमध्ये असते. माझ्या नवऱ्याची बायको, तुला पाहते रे, स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकांचा टीआरपी नेहमीच वर असतो. आता पुढच्या वर्षी यात आणखी भर पडणार आहे एका मालिकेची.

'रात्रीस खेळ चाले' मालिकेनं अगदी पहिल्या भागापासून ते शेवटच्या भागापर्यंत या मालिकेने प्रेक्षकांना टीव्ही स्क्रीनला खिळवून ठेवलं होतं. या मालिकेतला नाईकांचा वाडा पाहायला आजही लोकांची गर्दी होत असते. कोकणची पार्श्वभूमी असलेल्या या मालिकेने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.

या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक खूशखबर. ही मालिका आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकताच झी मराठी वाहिनीवर 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेच्या रहस्यमय म्युझिकवर एक गूढ टीझर रिलीज झाला. तसंच हा टीझर झी मराठीच्या सोशल मीडियावर देखील पोस्ट करण्यात आला आहे.कलाकारही गेल्या वेळचेच आहेत.

यावेळी ही मालिका उलटा प्रवास करणार आहे. अण्णांपासून हा खेळ सुरू होणार आहे. कोकणातली भूत एकदा मागे लागली की सोडता नाय' असा दाखला घेऊन छोट्या पडद्यावर 'रात्रीस खेळ चाले' मालिकेनं दहशत निर्माण केली. विशेष म्हणजे कोकणी लहेजा आणि नवख्या कलाकारांना घेऊन या मालिकेनं सुरुवात केली आणि थोड्याच अवधीत लोकप्रियतेचा शिखर सर केला. पण, कोकणाचं पर्यटन आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याच्या आरोपामुळे 'रात्रीस खेळ चाले' मालिकेला विरोधही झाला.

मनसे आणि शिवसेनेनं ही मालिका बंद करावी अशी मागणीच केली. पण असा कोणताही प्रकार होणार अशी ग्वाही दिग्दर्शकांनी दिली. त्यानंतर या मालिकेनं कोकणासह महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांना झपाटलं. बघता बघता रात्रीस खेळ चालेनं 200चा टप्पाही पार केला.

पहिल्या भागात नाईक कुटुंबातल्या अण्णांचा झालेला मृत्यू आणि त्यानंतरच्या गूढ घटना उत्सुकता वाढवत होत्या. जमिनीच्या वादावरुन नेने वकीलांचा खून झाला. त्याचा तपास करण्यासाठी अभिरामचा मित्र विश्वसराव हा पोलीस निघतो. तळघरात सापडलेले सांगाडे, आणि छायाच्या लग्नाच्या दिवशी अजयचा खून होणे हे मालिकेला निर्णायक वळण देणारे ठरले.

मुक्ता-स्वप्नीलचा बाॅक्स आॅफिसवर कोटींचा पल्ला, पहा मराठी सिनेमांची उड्डाणं

First published: December 10, 2018, 7:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading