Home /News /entertainment /

'रात्रीस खेळ चाले 3' मालिका होणार बंद, वाचा कधी असणार Last Episode

'रात्रीस खेळ चाले 3' मालिका होणार बंद, वाचा कधी असणार Last Episode

छोट्या पडद्यावरील 'रात्रीस खेळ चाले' (Ratris Khel Chale 3) ही मराठी मालिका प्रचंड लोकप्रिय ठरली होती. या मालिकेला प्रेक्षकांनी अफाट प्रेम दिलं होतं. मालिकेसोबतच यातील कलाकरांनासुद्धा प्रचंड प्रेम आणि प्रसिद्धी मिळाली होती. प्रेक्षकांकडून मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर या मालिकेसाने 1..2 नव्हे तर तब्बल 3 भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले होते.

पुढे वाचा ...
  मुंबई, 9 एप्रिल- छोट्या पडद्यावरील 'रात्रीस खेळ चाले'  (Ratris Khel Chale 3)  ही मराठी मालिका प्रचंड लोकप्रिय ठरली होती. या मालिकेला प्रेक्षकांनी अफाट प्रेम दिलं होतं. मालिकेसोबतच यातील कलाकरांनासुद्धा प्रचंड प्रेम आणि प्रसिद्धी मिळाली होती. प्रेक्षकांकडून मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर या मालिकेसाने 1..2 नव्हे तर तब्बल 3 भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. सध्या या मालिकेचा 3 रा भाग पाहायला मिळत आहे. मात्र लवकरच ही मालिका निरोप घेणार असल्याचं (Ratris Khel Chale 3 Off Air) समोर आलं आहे. मालिकेत दडलेली अनेक गुपितं, थरारक चित्रीकरण आणि कलाकारांचा दमदार अभिनय या सर्वांमुळे 'रात्रीस खेळ चाले' ही मालिका अतिशय लोकप्रिय झाली होती. मालिकेला अफाट यश मिळाल्याचं पाहून निर्मात्यांनी मालिकेचा दुसरा भागदेखील प्रेक्षकांच्या भेटीला आणला होता. या भागालासुद्धा प्रेक्षकांकडून तितकाच प्रतिसाद मिळाला होता. मालिकेतील आण्णा, शेवंता, माई, पांडू, सुसल्या,छाया,दत्ता या सर्व व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांच्या मनावर घट्ट पकड निर्माण केली होती. मालिकेच्या दोन्ही भागात काही गुपित तशीच ठेवण्यात आली होती. आणि म्हणूनच मालिकेचा तिसरा भागदेखील सुरु करण्यात आला होता. त्यांनतर लॉकडाऊनमह्ये काही दिवस मालिकेचं चित्रीकरण बंद ठेवण्यात आलं होतं. परंतु सर्वकाही सुरळीत झाल्यानंतर पुन्हा शूटिंग सुरु झालं होतं. पुन्हा या मालिकेच्या तिसऱ्या भागाचे नवीन एपिसोड प्रेक्षकांना पाहायला मिळाले होते.
  View this post on Instagram

  A post shared by (@marathiserials_official)

  मालिका घेणार निरोप- 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेच्या इतर दोन भागांप्रमाणेच या भागासाठीसुद्धा प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता होती. प्रेक्षक मालिकेच्या तिसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहात होते. 'रात्रीस खेळ चाले 3' सुरु झाल्यानंतर सुरुवातीला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला खरा, पण त्यांनतर मालिकेत झालेलं बदल आणि नवनवीन ट्विस्ट प्रेक्षकांना फारसं रुचल्याचं दिसत नाहीत. त्यामुळेच ही मालिका आता बंद होणार आहे. इतकंच नव्हे तर आज या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित केला जाणार आहे.मराठी सिरियल्सच्या अधिकृत इन्स्टा पेजवर ही बातमी शेअर करण्यात आली आहे.परंतु मालिकेच्या टीमकडून अजूनही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाहीय. त्यामुळे थोडी प्रतीक्षा करावी लागेल.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Marathi entertainment, Tv serial, Zee marathi serial

  पुढील बातम्या