• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • 'रात्रीस खेळ चाले’ मध्ये दिसणार नवीन शेवंता, का सोडली अपूर्वाने मालिका?

'रात्रीस खेळ चाले’ मध्ये दिसणार नवीन शेवंता, का सोडली अपूर्वाने मालिका?

'रात्रीस खेळ चाले 3' (ratris khel chale 3) मधून शेवंता फेम अपूर्वाने पुन्हा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. पण आता सर्वांच्या लाडक्या शेवंताची जागा दुसऱ्या अभिनेत्रीने घेतल्याची माहिती समोर आली आहे.

 • Share this:
  मुंबई, 24 नोव्हेंबर- 'रात्रीस खेळ चाले' ही छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय मालिका. या मालिकेतील सर्व पात्रे म्हणजे अण्णा, शेवंता, माई, पांडू, सुसल्या ही देखील खूपच लोकप्रिय झाली. कोकणातील माणसाची नेमकी नस या मालिकेतून दाखवण्यात आल्याने अनेकांनी ही मालिका आपली वाटू लागली. या मालिकेतील अण्णा नाईकांची शेवंता अख्या महाराष्ट्राची फेवरेट आहे. शेवंताची भूमिका अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने (krutikaa tulaskar) साकारली आहे. .'रात्रीस खेळ चाले 3' (ratris khel chale 3) मधून शेवंता फेम अपूर्वाने पुन्हा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. पण आता सर्वांच्या लाडक्या शेवंताची जागा दुसऱ्या अभिनेत्रीने (krutikaa tulaskar)घेतल्याची माहिती समोर आली आहे. सोशल मीडियावर देखील या अभिनेत्रीचे शेवंताच्या रूपातील फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. शेवंताच्या भूमिकेमुळं घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर आता मालिकेत दिसणार नाही. पण तिनं मालिका का सोडली याबद्दल कोणतेच कारण समोर आलेले नाही. आता अपूर्वाच्या जागी नवीन अभिनेत्री दिसणार आहे. सोशल मीडियावर या नवीन शेवंताचा फोटो व्हायरल झाला आहे. यापुढं अभिनेत्री कृतिका तुळसकर शेवंताची भूमिका साकारणार आहे. वाचा : प्रियांका चोप्रा आहे प्रेग्नेंट? घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान अभिनेत्रीचं 'ते' वक्तव्य आलं चर्चेत कृतिका तुळसकर शेवंताच्या रूपातील फोटो पोस्ट करत म्हटलं आहे की,आज पर्यंत घायळ केलं, ह्या वेळेस जीवच घेईन.#शेवंता #रात्रीसखेळचाले३. पहायला विसरू नका... रोज रात्री 11 वाजता. आपल्या झी मराठी वर...अशी पोस्ट करत तिनं याबद्दल माहिती दिली आहे. त्यामुळे ही नवीन शेवंता प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणार का, असा प्रश्न पडला आहे. वाचा: ‘आई कुठे काय करते’ मधील संजनाने रूपाली भोसलेला मिळवून दिला मोठ्या नावाचा पुरस्कार; स्वतः शेअर केली बातमी नवीन शेवंताला पाहून प्रेक्षकांना धक्का बसल्याचं पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर प्रेक्षक प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी नाराज झाल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी जुनी शेवंताच पुन्हा मालिकेत पाहिजे,असंही म्हटलं आहे.
  'रात्रीस खेळ चाले' या मालिकेच्या पहिल्या दोन्ही पर्वांना प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिल्यामुळे याचे तिसरे पर्वही प्रसारित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याला देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता शेवंताच्या एक्झिटमुळे मालिकेवर काय परिणाम होणार हे देखील येणाऱ्या भागात समजेल.
  Published by:News18 Trending Desk
  First published: