तुम्ही घेतलं का जस्टिन बिबरच्या काॅन्सर्टचं तिकीट?

तुम्ही घेतलं का जस्टिन बिबरच्या काॅन्सर्टचं तिकीट?

या कॉन्सर्टच्या तिकिटांचा दर 4060 रुपयांपासून ते थेट 76790 रुपयांपर्यंत आहे.

  • Share this:

चित्राली चोगले, 10 मे : जस्टिन बिबर हा कनेडियन गायक मुंबईत त्याच्या पहिल्या लाईव्ह कॉन्सर्टसाठी येतोय म्हटल्यावर अनेकांनी तिकिटांची विक्री सुरू होण्याआधीच तिकिटांचा जुगाड सुरू केला. 'अरे बघ ना तिकिटं मिळतायेत का'पासून 'मला जरा दोन तीन तिकिटं करुन दे'पर्यंत अनेकांचे प्रयत्न सुरु होते.आता तर अवघे काही तास उरले आहेत या कॉन्सर्टला पण तरीही या तिकिटांचा जुगाड सुरूच आहे.

काही जस्टिनचे फॅन्स आहेत म्हणून जात आहेत, तर काही एक स्टाईल स्टेटमेन्ट म्हणून मिरवण्यासाठी तर काही अगदीच गम्मत म्हणून.

पण त्यामुळे कॉन्सर्टच्या तिकीटांचा खप यामुळे अधिक वाढला हे निश्चित.

या कॉन्सर्टच्या तिकिटांचा दर 4060 रुपयांपासून ते थेट 76790 रुपयांपर्यंत आहे. हे दर झाले अधिकृत. पण अनधिकृतपणे ही तिकिटं वाट्टेल त्या भावात विकल्या जातानाचं सध्याचं दृष्य आहे.

जस्टिनच्या या कॉन्सर्टला अनेक बॉलिवूडकरही हजेरी लावणार असल्याचं बोललं जातंय . या बॉलिवूडकरांसोबत पार्टी करता यावी फोटो काढता यावे किंवा स्टेसस सिंबॉल म्हणून यांच्या सोबत तिथे हजर रहावं म्हणून व्हीव्हीआयपी तिकिटांचे दर अधिक आहेत.यांचे अधिकृत दर 76000 रुपये आहेत. तर कॉलेज स्टुडंट्स आणि काही मध्यम वर्गातील फॅन्स मात्र 4000ची तिकीट घेणं पसंत करत आहेत.

 तिकिटांची श्रेणी     अधिकृत दर   

जीए एरिया            4060

सिल्वर झोन          7700

गोल्ड झोन            10080

प्लॅटिनम झोन         15400

डायमंड झोन           25200

व्ही व्ही आय पी 3    36305

व्ही व्ही आय पी 2     58030

व्ही व्ही आय पी 1     76790

व्ही व्ही आय पी 1 या तिकिटांची विक्री तर खुद्द जस्टिनची मॅनेजमेन्ट पाहतेय. या तिकिटं ज्यांच्याकडे आहेत त्यांना कॉन्सर्ट फक्त जवळून पहाता येणार नाहीये तर त्यासोबत बॅकस्टेजची सफर सुद्धा त्यांना घडवली जाणार आहे. या कॉन्सर्टच्या आधी काय होतं, स्टेजच्या मागे काय माहोल असतो,  शिवाय ही टूर यशस्वी करण्यात काय मेहनत आणि मुद्दे आहेत या सगळ्याचा अनुभव या व्ही व्ही आय पी 1च्या तिकीट धारकाला मिळणार आहे.

जस्टिनच्या कॉन्सर्टच्या यशाचं गणित या तिकिटांच्या विक्रीवरच बेतलेलं आहे. जी खूप उत्तम झाली आहे. 22 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता जेव्हा पहिल्यांदा ही तिकीट विक्री ऑनलाईन सुरू झाली  तेव्हा अवघ्या काही मिनिटांमध्ये 50000 पेक्षा जास्त लोक वेटिंगवर होते या तिकिटांसाठी. तर या बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चीत कॉन्सर्टला थोड्याच वेळात सुरुवात होईल ज्याची तिकिटं अजूनही विकली जात आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 10, 2017 01:55 PM IST

ताज्या बातम्या