मुंबई, 30 डिसेंबर- उद्योगपती रतन टाटा ( ratan tata 84th birthday ) यांनी नुकतंच वयाच्या 84 व्या वर्षात पदार्पण केलं आहे. अत्यंत साधेपणाने त्यांनी वाढदिवस साजरा केला. त्यांनी छोट्या कप केकवर लावलेल्या मेणबत्तीला फुंकर मारून आपला वाढदिवस आनंदात साजरा केला. या वाढदिवसाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. साधेपणाने साजरा केलेल्या वाढदिवसावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. मराठमोळा अभिनेता किरण माने (kiran mane) याने देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. सध्या किरण मानेची ही पोस्ट चर्चेत आली आहे.
किरण मानेने इन्स्टा पोस्ट करत म्हटलं आहे की, खरंय..खरंय.. या महान माणसाच्या या कृतीनं खरंच लै जनांच्या सनसनीत कानफाडीत मारलेली हाय या ठिकानी...! ...परवाच माझ्या एका मित्रानं त्याच्या शुटिंग सेटवरच्या प्राॅडक्शन कंट्रोलरचा वाढदिवस साजरा करतानाचा व्हिडीओ शेअर केला होता.. "किरण, आम्ही कस्लं एंजाॅय केलं बघ." म्हन्ला.. चाळीस-बेचाळीस केक आणून त्यात बचाबचा हात बुडवून एकमेकांच्या तोंडावर थापन्याची अक्षरश: रंगपंचमी चालली होती ! सगळ्या परीसरात पडणारा केकचा सडा..मूठमूठभर क्रीम हात घेऊन एकमेकांमागे चाललेली पळापळी.. केकची फेकाफेकी बघून संताप येत होता.. बरं, ज्याचा वाढदिवस साजरा होत होता, त्याचं कर्तृत्व, त्याची लायकी, त्याचं 'कॅरॅक्टर', त्याची नैतीकता अशी आहे की त्याची वाढदिवसादिवशी खेटरानं पूजा केली तरी कमी हाय !!! त्याचवेळी एका गल्लीतल्या एका सडकछाप गावगुंडानं तलवारीनं केक कापल्याचा एक फोटो बघूनबी संताप येत होता.. असो.
वाचा- शिल्पा शिरोडकरला कोरोनाची लागण ; पोस्ट शेअर करत दिली माहिती
..आपन या व्हीडीओबद्दल बोलूया. यात दिसनारा ह्यो मानूस साधासुधा नाय... ह्यानं चाळीस कोटी केक कापले तरी कमीच हाय यवढं याचं काम हाय... 'टाटा उद्योगसमूहाला' नवी दिशा देनार्या या मानसाचा 'साधेपना' भल्याभल्यांना थक्क करनारा हाय भावांनो.. ल्हानपनीपास्नंच यानं 'आपन जमशेदजी टाटा यांचे नातू आहोत' असा आव आनला नाय... 'टाटा' हे आपलं फक्त आडनांव हाय, आपन आपल्या सोत्ताच्या बळावर उभं र्हायचं या विचारानं झपाटलेला ह्यो गडी ! आर्किटेक्ट होन्यासाठी जवा अमेरीकेला गेला तवा तिथं शिक्षन आनि उमेदवारीच्या दहा वर्षांत या अवलीयानं हाटेलात भांडी घासन्यापास्नं, कारकुनाच्या नोकरीपर्यंत जे जमंल ते केलं !!
वाचा-'माझी तुझी रेशीमगाठ'मधील नेहा आणि परीचे हिलेरियस फ्यूजन पाहिले का?
परत आल्यावर 'टाटा समूहा'त दाखल व्हायच्या आधी जमशेदपूरच्या 'टाटा स्टील'मध्ये या पठ्ठ्यानं कोळशाची पोती पाठीवरनं वहान्यापास्नं ते धगधगत्या भट्टीपाशी काम करण्यापर्यंतचे सर्व अनुभव घेतल्यानंतरच कंपनीची धूरा हातात घेतली... त्यानंतर त्यानं काय केलं ते मी हितं सांगायची गरजच नाय... नेल्को वर आनन्यापास्नं ते जग्वार आन् लॅंडरोव्हर इकत घेन्यापर्यन्तचा इतीहास भुगोल जगाला म्हायतीय... बापजाद्यांची एकेक प्राॅपर्टी इकून थयाथया नाचनार्या भुरट्यांची सद्दी असताना, आधीपास्नं असलेल्यात भर घालून नव्या भरीव गोष्टी इकत घेनारा ह्यो मानूस मोलाचा ठरतो, तो यासाठीच !
View this post on Instagram
...तर सांगायचा मुद्दा ह्यो की, कालच या मानसानं वयाचा ८४ वा बर्थ डे असा साजरा केला ! हे पाहुन, या ठिकानी आपन सगळ्यांनी सोत्ताला एक मुस्काडात नाय मारून घेतली तरी हरकत नाय.. पन यातनं कायतरी शिकूया, हीच अपेक्षा !कडकडीत सलाम रतन टाटा. लब्यू ❤️...किरण माने यांनी यासोबत एक व्हिडिओ देखील केला आहे. किरण मानेच्या या पोस्टचे चाहत्यांकडून देखील कौतुक होत आहे.
वाचा-'हे केवढे रामदास पाध्ये सारखे दिसतात' ; सोनाली पुढे विजू माने निरूत्तर
मुलगी झाले हो या मालिकेत किरण माने साजिरीच्या वडिलांची म्हणजे विलास पाटलाची भूमिका साकारत आहे. या भूमिकेमुळे तो सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतात. याशिवाय किरण माने त्यांच्या लिखाणाच्या शैलीमुळे देखील सोशल मीडियावर चर्चेत असतात. विविध विषयावर ते दिलखुलास मत मांडत असतात. त्यांचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.