• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • VIDEO : ही मराठमोळी अभिनेत्री करणार लग्न ; गोव्याच्या बीचवर केले Pre-Wedding Shoot

VIDEO : ही मराठमोळी अभिनेत्री करणार लग्न ; गोव्याच्या बीचवर केले Pre-Wedding Shoot

मराठमोळ्या अभिनेत्रीने नुकतेच गोव्याच्या समुद्र किनारी प्रिवेडिंग फोटोशूट केले आहे. याचा एक रोमँटिक व्हिडिओ सोशल मीडियावर तिने शेअर केला आहे.

 • Share this:
  मुंबई, 25 ऑक्टोबर : माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील शनया म्हणजेच अभिनेत्री रसिका सुनील (Rasika sunil ) आता लवकरच लग्न करणार आहे. नुकतेच रसिका आणि आदित्य (Aditya Bilagi) हे दोघेही गोव्याला दाखल झाले आहेत. तिथल्या समुद्र किनारी त्यांनी शूट (rasika sunil prewedding shoot)केलेला एक रोमँटिक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये रसिकाच्या हातावर मेहंदी दिसत आहे. या दोघांनीही अद्याप लग्नाची तारीख जाहीर केलेली नाही. मात्र हा व्हिडिओ पाहून हे जोडी लवकरच लग्न बंधनात (Rasika sunil married soon) अडकणार अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. रसिका सुनिलने if you see the signs, you know what’s coming! Wait for it! असे कॅप्शन देऊन हातावर मेहेंदी असलेला हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. रसिकाच्या ह्या व्हिडीओ वरून हे ती लवकरच आदित्य बिलागी सोबत लग्न करणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यांच्या ह्या प्रिवेडिंग फोटोशूटवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होत आहे. रसिकाने शेअर केलेल्या या व्हिडिओच्या शेवटी देखील रसिका वेड्स आदित्य असं येत आहे. तसेच रसिकाच्या हातावरची मेहंदी पाहून तर ती लवकरच लग्नगाठ बाधणार असल्याचे निश्चित झालं आहे असं दिसत आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Rasika Sunil (@rasika123s)

  या व्हिडिओमध्ये रसिकाने पिवळ्या रंगाच ड्रेस घातला आहे तर आदित्य पांढऱ्या रंगाच्या टी शर्टमध्ये दिसत आहे. या व्हिडिओमध्ये दोघांचाही रोमँटिक अंदाज तर पाहायला मिळतच आहे पण त्यांच्यातील केमेस्ट्री देखील चाहत्यांचे लक्षवेधून घेत आहे. वाचा : पतीवर होणाऱ्या गंभीर आरोपानंतर अभिनेत्री क्रांती रेडेकरचं Tweet व्हायरल माझ्या नवऱ्याची बायको मालिकेत अभिनेत्री रसिका सुनीलनो शनया ही विरोधी भूमिका साकारली असली तरी तिने प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घातली होती. या मालिकेमुळे ती महाराष्ट्राच्या घराघरात पोहचली आता ती लवकरच लग्नगाठ बांधणार आहे म्हटल्यावर चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी ठरत आहे. रसिकांने यापूर्वी पोश्टर गर्ल, गॅट मॅट, बघतोस काय मुजरा कर या चित्रपटात महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.तुम बिन मोहें… या व्हिडीओ अल्बममध्ये गायनासोबतच त्यात रसिकाने कामही केले होते. रसिकाने अभिनय, गायन आणि दिग्दर्शन या तिन्ही क्षेत्रात काम केले आहे. वाचा : `सॅक्रेड गेम्स`मधील `या` अभिनेत्रीचा इंटिमेट सीनवर धक्कादायक खुलासा रसिकाचा होणारा नवरा आदित्य बिलागी काय करतो? आदित्य बिलागी हा मूळचा औरंगाबादचा आहे. परंतु गेल्या नऊ वर्षांपासून तो लॉस एंजेलिसमध्ये स्थायिक झाला आहे. आदित्य हा इंजिनीअर तर आहेच. त्याशिवाय तो उत्कृष्ट डान्सर, गायक देखील आहे. आदित्यने त्वायक्वांडोमध्ये ब्लॅक बेल्टही मिळवला आहे. काही वर्षांपूर्वी रसिका ही शिक्षणासाठी परदेशात गेली होती. तिथेच तिची भेट आदित्यसोबत झाली होती. रसिका आणि आदित्य यांची पहिली भेट 2018 मध्ये लॉस ऐंजिलीसमध्ये एका कौटुंबिक कार्यक्रमात झाली होती. त्यानंतर या दोघांनी 2020 मध्ये एकमेकांना भेटायला सुरुवात केली. या भेटीचे रूपांतर प्रेमात झाले आणि आता हे दोघे लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. विशेष म्हणजे यांनी काही दिवसापूर्वी लग्न करणार असल्याचे सांगितले असले तरी कधी करणार आहे याची तारीख मात्र आजपर्यंत गुलदस्त्यात ठेवली आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published: