Home /News /entertainment /

Rashmika च्या हाती लागला मोठा प्रोजेक्ट, Allu Arjun नंतर या स्टारसोबत रोमान्स करणार श्रीवल्ली

Rashmika च्या हाती लागला मोठा प्रोजेक्ट, Allu Arjun नंतर या स्टारसोबत रोमान्स करणार श्रीवल्ली

'पुष्पा' (Pushpa: The Rise) केल्यानंतर अल्लू अर्जुनची (Allu Arjun) लोकप्रियता तर वाढलीच, पण रश्मिका मंदनाही (Rashmika Mandanna) देशभरातील लोकांच्या मनावर राज्य करू लागली आहे.

    मुंबई, 10 फेब्रुवारी-   'पुष्पा'   (Pushpa: The Rise)  केल्यानंतर अल्लू अर्जुनची   (Allu Arjun)  लोकप्रियता तर वाढलीच, पण रश्मिका मंदनाही   (Rashmika Mandanna)  देशभरातील लोकांच्या मनावर राज्य करू लागली आहे. ही अभिनेत्री आता केवळ दक्षिणेतीलच नव्हे तर उत्तर भारतातील स्टार्समध्येही सर्वात लोकप्रिय अभिनेत्री बनली आहे. तिला काही हिंदी प्रोजेक्ट्समध्ये काम करण्याची संधीही मिळाली आहे. टॉलिवूडमधील रिपोर्टनुसार, रश्मिका तिच्या आगामी प्रोजेक्टमध्ये सुपरस्टार राम चरणसोबत अभिनय करताना दिसणार आहे. राम चरणच्या आगामी चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून रश्मिकाची निवड करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. परंतु, या चित्रपटाचं फायनल नाव अद्याप ठरलेलं नाही. रामचरणच्या चित्रपटात रश्मिकाच्या सहभागाबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाहीय. परंतु काही वेब मीडिया प्लॅटफॉर्मने असा दावा केला आहे की निर्माते पुष्पाच्या श्रीवल्लीला मुख्य भूमिकेसाठी विचारात घेत आहेत. रामचरण सध्या RC16 मध्ये काम करत आहे. अॅक्शन एंटरटेनर RC16 चं दिग्दर्शन गौतम तिन्नानुरी यांनी केलं आहे. आणि ज्युनियर एनटीआर सिनेमाज यांच्या संयुक्त विद्यमाने यूवी क्रिएशन्स निर्मित. या प्रकल्पाची घोषणा गेल्या वर्षी दसऱ्याच्या वेळी करण्यात आली होती. यामध्ये कियारा अडवाणीसुद्धा आहे. या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झाल्यानंतर रामचरण रश्मिका मंदनासोबत त्याच्या पुढच्या चित्रपटाची शूटिंग करणार असल्याचं म्हटलं जात आहे.दुसरीकडे, पुष्पा फेम अभिनेत्री रश्मिका 'पुष्पा 2: द रुल' या चित्रपटाच्या सिक्वेलचं शूटिंग करत आहे. तसेच अभिनेत्रीनं सिद्धार्थ मल्होत्रासोबत मिशन मजनू आणि अमिताभसोबत गुडबायचचं शेड्यूल पूर्ण केलं आहे. दुसरीकडे, रामचरण एसएस राजामौली यांच्या दिग्दर्शनाखाली 'आरआरआर' रिलीज होण्याची आतुरतेने वाट पाहात आहे. ज्यामध्ये ज्युनियर एनटीआर, आलिया भट्ट, अजय देवगण हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय चरणचा 'आचार्य' देखील रिलीजसाठी सज्ज आहे. जो एप्रिलमध्ये रिलीज होऊ शकतो. या चित्रपटात अभिनेता त्याचे वडील चिरंजीवीसोबत दिसणार आहे.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Entertainment, Rashmika mandanna, South actress

    पुढील बातम्या