मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Throwback: ओळखा पाहू! फोटोतील या चिमुकलीला; आज आहे सिनेसृष्टीतील सर्वात महागडी अभिनेत्री

Throwback: ओळखा पाहू! फोटोतील या चिमुकलीला; आज आहे सिनेसृष्टीतील सर्वात महागडी अभिनेत्री

चाहत्यांना कलाकारांचे थ्रोबॅक फोटो पाहण्यात बराच रस असतो. बऱ्याचवेळा हे कलाकार आपल्या बालपणीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India
  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 4 सप्टेंबर-   कलाकार आणि चाहते यांचं नातं फार वेगळं असतं. आपल्या आवडत्या कलाकारासाठी चाहते अनेक थक्क करणाऱ्या गोष्टी करत असतात. तर काही कलाकारसुद्धा आपल्या चाहत्यांना सरप्राईज देऊन चकित करत असतात. तसेच चाहत्यांना आपल्या आवडत्या कलाकाराबाबत अधिकाअधिक माहिती जाणून घ्यायला आवडतं. चाहत्यांना कलाकारांचे थ्रोबॅक फोटो पाहण्यात बराच रस असतो. बऱ्याचवेळा हे कलाकार आपल्या बालपणीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर एका चिमुकलीचा फोटो सध्या चर्चेत आहे. अनेकांना प्रश्न पडला आहे, फोटोत दिसणारी ही चिमुकली नेमकी आहे तरी कोण? काहींना ओळखण्यात यश आलं तर काहींना ओळखणं कठीण जात आहे. लाल रंगाचा वेस्टर्न ड्रेस घालून स्टेजवर डान्स करणाऱ्या या मुलीला तुम्ही ओळखलं का? हा फोटो एखाद्या शाळेच्या गॅदरिंगदरम्यानचा असल्याचं लक्षात येत आहे. तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो या फोटोत दिसणारी ही चिमुकली इतर कुणी नसून साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदाना आहे.

हा फोटो गेल्यावर्षी रश्मिकाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला होता. फोटो शेअर करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहलं होतं, ' विचित्र हावभावासाठी माफ करा आणि अंदाज लावा की मी कोणत्या गाण्यावर डान्स करत या आहे. यासोबत अभिनेत्रीने एक हिंट देत सांगितलं होतं की, हे गाणं 2004/2005 मधील सुपरहिट गाणं आहे.त्यानंतर तिच्या चाहत्यांनी अनेक कमेंट्सदेखील केल्या होत्या.

(हे वाचा: Good Bye Poster: 'बाबा आणि मी येतेय भेटीला', रश्मिका मंदानाने शेअर केला 'गुड बाय'चा फर्स्ट लुक)

रश्मिका मंदाना सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. अभिनेत्री आपल्या खाजगी आणि व्यावसायिक आयुष्याबाबत प्रत्येक अपडेट शेअर करत असते. कामाबाबत सांगायचं झालं तर, रश्मिका मंदाना लवकरच अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'गुडबाय'मध्ये दिसणार आहे. नुकतंच या चित्रपटाचं फर्स्ट पोस्टर रिलीज झालं आहे. येत्या 7 ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

First published:

Tags: Entertainment, Rashmika mandanna, South actress