अभिनेत्री रश्मिका मंदाना घरावर इनकम टॅक्स अधिकाऱ्यांची छापेमारी

अभिनेत्री रश्मिका मंदाना घरावर इनकम टॅक्स अधिकाऱ्यांची छापेमारी

अभिनेत्री रश्मिका मंदाना हिच्या घरावर इनकम टॅक्स डिपार्टमेंटनं छापा घातला.

  • Share this:

बंगळुरू, 16 जानेवारी : साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना हिच्या घरावर इनकम टॅक्स डिपार्टमेंटनं छापा टाकल्याची माहिती मिळाली आहे. इनकम टॅक्स डिपार्टमेंटनं आज म्हणजेच 16 जानेवारीला सकाळी हा छापा घातला. एका कन्नड न्यूज चॅनलनं दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी 7.30 च्या सुमारास 10 ऑफिसर्स तिच्या घरी पोहोचले होते.

रश्मिकानं टॅक्स चुकवल्यानं तिच्या घरी हा छापा घालण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. अभिनेत्री आपल्या इनकमनुसार टॅक्स भरला की नाही यांची चौकशी इनकम टॅक्स अथॉरिटीला करायची असल्याचं समजतं. रश्मिका कर्नाटकच्या विराजपेटमध्ये राहते. ती साऊथ सिने सृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे.

Shershaah first look रिलीज, सिद्धार्थ मल्होत्राला मिळालं वाढदिवसाचं बेस्ट गिफ्ट

 

View this post on Instagram

 

Photographer: Turn left Me: is this okay?

A post shared by Rashmika Mandanna (@rashmika_mandanna) on

काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेला तिचा Sarileru Neekevvaru हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या सिनेमात अभिनेता महेश बाबू मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमातील रश्मिकाच्या भूमिकेच कौतुक केलं जात आहे. रश्मिकानं आतापर्यंत तमिळ, तेलुगू आणि कन्नड सिनेमांमध्ये काम केलं आहे. सोशल मीडियावरही तिचा तगडा चाहता वर्ग आहे. तसेच इन्स्टाग्रामवरही तिचे 40 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

लंडनमध्ये कॅब ड्रायव्हरच्या वर्तनानं हादरली सोनम कपूर, वाचा नक्की काय घडलं

कबीर बेदींनी केली चार लग्नं, पहिल्या पत्नीच्या न्यूड फोटोंनी घातला होता धुमाकूळ!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Bollywood
First Published: Jan 16, 2020 02:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading