मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Rashmika Mandannaच्या चाहत्याने अशा ठिकाणी मागितला ऑटोग्राफ की लाजेने झाली लाल, पाहा VIDEO

Rashmika Mandannaच्या चाहत्याने अशा ठिकाणी मागितला ऑटोग्राफ की लाजेने झाली लाल, पाहा VIDEO

Rashmika Mandanna

Rashmika Mandanna

दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदाना लवकरच बॉलिवूड पदार्पण करत आहे. अशातच तिचे अनेक आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे ती सतत कोणत्या न कोणत्या कारणावरुन चर्चेत असते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Sayali Zarad

मुंबई, 26 सप्टेंबर : दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदाना लवकरच बॉलिवूड पदार्पण करत आहे. अशातच तिचे अनेक आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे ती सतत कोणत्या न कोणत्या कारणावरुन चर्चेत असते. बॉलिवूड पदार्पणाआधीच रश्मिकाची क्रेझ अफाट आहे. तिचा चाहतावर्ग मोठा असून तिच्यासाठी चाहते काहीही करायला तयार आहेत. नुकतंच रश्मिका आणि तिच्या चाहत्याचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय.

रश्मिका मंदाना आज मुंबईत दिसली जिथे तिचा एक खास चाहता मिळाला. त्या चाहत्याने अभिनेत्रीकडे अशा ठिकाणी ऑटोग्राफची मागणी केली की, आधी रश्मिका लाजेनं लाला झाली. चाहत्याने रश्मिकाला तिच्या छातीवर ऑटोग्राफ देण्याची विनंती केली, जे ऐकून अभिनेत्री थोडी स्तब्ध झाली आणि तिचा चेहरा देखील लाल झाला. त्यानंतर रश्मिकाने चाहत्याच्या टी-शर्टवर ऑटोग्राफ दिला.

रश्मिका आणि तिच्या चाहत्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रियाही येत आहेत. अनेकजण त्याला लकी चाहता असल्याचं म्हणत आहे.

रश्मिका लवकरच 'गुडबाय' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात रश्मिका मंदाना अमिताभ बच्चन यांच्या मुलीची भूमिका साकारत आहे. नीना गुप्ता या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना वडील आणि मुलगी यांच्यातील आंबट-गोड बॉन्डिंग पहायला मिळणार आहे. हळूहळू रश्मिका आता ग्लोबल स्टार बनत आहे. साऊथमध्ये डंका वाजवल्यानंतर ही अभिनेत्री बॉलीवूडच्या वाटेवर निघाली आहे.

First published:

Tags: Bollywood, Bollywood News, Rashmika mandanna, South actress, South film