मुबई,5 नोव्हेंबर- कलाकार (Celebraty) म्हटलं की चाहतावर्ग हा आलाच. चाहत्यांना कलाकारांच्या प्रत्येक लहान-लहान गोष्टी जाणून घ्यायच्या असतात. तसेच आपल्या लाडके कलाकार यापूर्वी कसे दिसत होते, हे जाणून सर्वांनाच उत्सुकता असते. त्यातल्या त्यात आपल्या आवडत्या अभिनेत्रीचा किंवा अभिनेत्याचा बालपणीचा फोटो (Childhood Pic) मिळाला तर चाहत्यांचा आनंद गगनाला भिडतो. आज आपण अशाच एका अभिनेत्रीच्या बालपणीचा फोटो पाहणार आहोत. हि अभिनेत्री आज नॅशनल कृष्ण म्हणून ओळखली जाते.
हा फोटो पाहून अनेक चाहत्यांना अंदाज आलाच कि ही अभिनेत्री कोण आहे. पण जर ओळखलं नसेल तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो, ही अभिनेत्री इतर कोणी नसून साऊथ क्वीन रश्मिका मंदना (Rashmika Mandnna) आहे. सोशल मीडियावर सध्या अभिनेत्रीचा हा बालपणीचा गोंडस फोटो व्हायरल होत आहे. फोटोमध्ये अभिनेत्री एका लाल रंगाच्या टी शर्टमध्ये खूपच क्युट दिसत आहे. हीच फोटोतील चिमुकली आज लाखो तरुणांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. या दाक्षिणात्य अभिनेत्रीला आज नॅशनल क्रश ऑफ इंडिया म्हटलं जातं.
View this post on Instagram
अभिनेत्री रश्मिका मंदना साऊथची फारच प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेलसुद्धा आहे. तिने प्रामुख्याने तेलुगू आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिने अनेक सुंदर चित्रपट दिले आहेत. त्यामुळे तिला क्रश ऑफ कर्नाटका म्हटलं जातं होतं. मात्र आता ती फक्त कर्नाटक नव्हे तर देशाची क्रश बनली आहे. रश्मिकाचा जन्म ५ एप्रिलला कर्नाटकातील कोडागु येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. अभिनेत्रीने याच ठिकाणी आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यांनतर तिने म्हैसूर युनिव्हर्सिटीतून उच्चशिक्षण घेतलं आहे. अभिनेत्रीने आर्ट्स, पत्रकारिता,इंग्लिश, मनोविज्ञान अशा विविध अभ्यासक्रमातून पदव्या घेतल्या आहेत. त्यामुळे ही अभिनेत्री प्रसिद्ध कलाकारच नव्हे तर एक उच्चशिक्षित अभिनेत्रीसुद्धा आहे.
(हे वाचा:नुसरत जहाँनं यशदास गुप्तासोबत केलं Twinning! लेकासोबत साजरी केली पहिली दिवाळी)
रश्मिका मंदानाने 'किरिक पार्टी' या कन्नड चित्रपटातून आपल्या अभिनयाची सुरुवात केली होती. अभिनेत्रीने साऊथमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. ती दक्षिणेतील सर्वात यशस्वी अभिनेत्रींपैकी एक समजली जाते. या अभिनेत्रीच्या अनेक चित्रपटांनी फारच कमी वेळेत १०० कोटींपर्यंतची मजल मारली आहे. त्यामुळे तिला फारच यशस्वी अभिनेत्री समजली जाते. साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडासोबत तिची जोडी खास पसंत केली जाते. या जोडीचे डिअर कॉम्रेड आणि गीता गोविंद हे लोकप्रिय चित्रपट आहेत. या चित्रपटांना फक्त साऊथमध्येच नव्हे तर संपूर्ण देशभरात पसंती मिळाली होती.
(हे वाचा:'आई म्हणत दिवाळीला चमकदार कपडे घाल'; जान्हवी कपूरला आली आई श्रीदेवीची आठवण )
रश्मिका मंदना सध्या बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. ती लवकरच सिद्धार्थ मल्होत्रासोबत 'मिशन मजनू' चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करणार आहे. नुकताच या चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे. मी महिन्यामध्ये हा चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे. तसेच अभिनेत्री बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबतही एका चित्रपटात झळकणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Rashmika mandanna