Home /News /entertainment /

अविवाहित रश्मिकाच्या पासपोर्टवरील सरनेम पाहून चाहते चकित; कारण आलं समोर

अविवाहित रश्मिकाच्या पासपोर्टवरील सरनेम पाहून चाहते चकित; कारण आलं समोर

नॅशनल क्रश रश्मिका मंदना (Rashmika Mandanna) सध्या तिच्या आगामी 'पुष्पा: द राइज' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात ती सुपरस्टार अल्लू अर्जुन झळकणार आहे.

    मुंबई, 16 डिसेंबर-   नॅशनल क्रश रश्मिका मंदना   (Rashmika Mandanna)  सध्या तिच्या आगामी 'पुष्पा: द राइज' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात ती सुपरस्टार अल्लू अर्जुन झळकणार आहे. प्रेक्षक चित्रपटगृहात हा चित्रपट पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहात आहेत. दरम्यान आम्ही तुम्हाला तुमच्या आवडत्या अभिनेत्रीबद्दल एक महत्त्वाची माहिती देत ​​आहोत जी कदाचित तुम्हाला माहिती नसेल. गेली काही दिवस रश्मिका तिच्या नवीन आडनावामुळे  (Rashmika Mandanna Surname)  चर्चेत आहे. 'नॅशनल क्रश रश्मिका' असा टॅग मिळालेल्या या अभिनेत्रीच्या नावाने तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. अभिनेत्रीच्या बोर्डिंग पासवर तिचे आडनाव मुंडाचडीरा आहे. तर जगभरातील लोक तिला रश्मिका मंदना म्हणून ओळखतात. यानंतर, त्याच्या चाहत्यांना नवीन आडनावाबद्दल संशय येऊ लागला, म्हणून त्यांनी याबद्दल इंटरनेट तपासण्यास सुरुवात केली. गुगलवर खूप शोध घेतल्यानंतर असे आढळून आले की पुष्पा फेम अभिनेत्रीच्या वडिलांचे पूर्ण नाव मदन मंदना मुंडाचडीरा आहे. अलीकडे, अभिनेत्री समंथासुद्धा तिच्या आडनावावरून खूप चर्चेत आली होती. तिनं आधी सोशल मीडियावर तिचं नाव बदलून समंथा अक्किनेनी ठेवलं होतं. आणि नागा चैतन्यपासून घटस्फोट घेतल्यानंतर तिने सामंथा रुथ प्रभू असं नाव बदललं होतं. तसंच देसी गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रियांका चोप्रानंही सोशल मीडियावरून पतीचं आडनाव हटवल्यानं बरीच चर्चा झाली होती. क्वांटिको स्टारने तिच्या नावाच्या मागे जोनस काढताच अनेकांना प्रश्न पडू लागला की ती निक जोनसपासून विभक्त होत आहे का? प्रियांकाच्या घटस्फोटाची बातमीही खूप व्हायरल झाली. पण नंतर तिने आपल्या पतीसोबतचे काही रोमँटिक फोटो शेअर केले आणि यूजर्सची बोलती बंद केली.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Entertainment, Rashmika mandanna

    पुढील बातम्या