Home /News /entertainment /

'पुष्पा'च्या यशानंतर Rashmika Mandanna चे चाहत्यांना सरप्राईज, खरेदी केलं नवं घर

'पुष्पा'च्या यशानंतर Rashmika Mandanna चे चाहत्यांना सरप्राईज, खरेदी केलं नवं घर

‘पुष्पा: द राइज’ (Pushpa: The Rise) हा दाक्षिणात्य चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला आहे. या सिनेमाच्या यशानंतर रश्मिकाने नवीन घर घेतले आहे.

  मुंबई, 4 फेब्रुवारी-  ‘पुष्पा: द राइज’ (Pushpa: The Rise) हा दाक्षिणात्य चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला आहे. कमाईचे सर्व रेकॉर्ड चित्रपटाने ब्रेक केले आहेत. त्यामुळे हे यश सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना सेलिब्रेट करत आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट अद्याप चित्रपटगृहांत प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. तर दोन्ही कलाकार आपल्या आगामी प्रोजेक्टच्या तयारीला लागले आहेत. लवकरच रश्मिका बॉलिवूडमध्ये (Rashmika Mandanna Bollywood Debut)  पदार्पण करत आहे. अशातच तिने चाहत्यांना आणखी एक सुखद धक्का दिला आहे. रश्मिकाने नुकतीच एक इन्स्टा स्टोरी शेअर केली असून त्यामध्ये तिने आपण नव्या घरात शिफ्ट झाल्याचे सांगितले आहे. तसेच तिने एक व्हिडिओ शेअर केला असून यात ती आपल्या घरातील सामानाचे पॅकींग करताना दिसत आहे. तसेच आपल्या नव्या घराची झलक दाखवत आहे. यावर तिने लिहलंय की, "शिफ्टिंग करणं सोपं नाही. परंतु, जेव्हा मी सांगितलं की मला माझं काम करणं आवडतं. मी मज्जा करत नाही." वाचा-राखी सावंतने घेतली राज कुंद्राची भेट, VIDEO शेअर करत म्हणाली... रश्मिकाने शेअर केलेल्या व्हिडिओत घरात ठिकठिकाणी सामान पॅक केलेले गठ्ठे दिसत आहेत. तसेच ती तेथून जाताना दिसत आहे. रश्मिकाने गेल्या वर्षी बॉलिवूड चित्रपटांच्या शूटिंगसाठी वेळेवर पोहोचता यावे म्हणून मुंबईत एक घर खरेदी केले होते. तिच्याकडे हैद्राबाद आणि गोव्यातही प्रॉपर्टी आहे. तिने गोव्यात आपला कथित बॉयफ्रेंड विजय देवरकोंडासोबत नववर्षाचे सेलिब्रेशन केले होते. यावेळी विजयचा भाऊ आनंद देवरकोंडाही त्यांच्यासोबत होता.
  रश्मिका मंदानाचा 'मिशन मजनू' लवकरच सिनेमागृहांत रश्मिका मंदाना लवकरच बॉलीवूडमध्ये डेब्यू करत आहे. ती ‘मिशन मजनू’ (Mission Majnu) आणि ‘गुडबाय’ (Goodbye) या चित्रपटांबाबत खूपच एक्साइटेड आहे. मिशन मजनू मध्ये ती अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिसणार असून पडद्यावर रोमांस करतानाही दिसणार आहे. हा चित्रपट १३ मे २०२२ ला प्रदर्शित होणार आहे. तर गुडबायमध्ये ती अमिताभ बच्चनसोबत दिसणार आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Bollywood News, Entertainment, Rashmika mandanna, Tollywood

  पुढील बातम्या