मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Rashmika Mandanna Birthday: नॅशनल क्रश झाली 25 वर्षांची; हसऱ्या चेहऱ्यामागं आहे टोचणारं दुःख

Rashmika Mandanna Birthday: नॅशनल क्रश झाली 25 वर्षांची; हसऱ्या चेहऱ्यामागं आहे टोचणारं दुःख

कन्नड सिनेसृष्टीतील दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाला (Rashmika Mandanna) गुगलने जबरदस्त सरप्राईज दिलं आहे. गुगलने रश्मिका मंदानाला नॅशनल क्रश (National Crush Of India 2020 Female) घोषित केलं आहे.

कन्नड सिनेसृष्टीतील दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाला (Rashmika Mandanna) गुगलने जबरदस्त सरप्राईज दिलं आहे. गुगलने रश्मिका मंदानाला नॅशनल क्रश (National Crush Of India 2020 Female) घोषित केलं आहे.

Rashmika Mandanna Birthday : दक्षिणात्य चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या (Rashmika Mandanna) चाहत्यांची संख्या कोट्यावधी आहे. अवघ्या काही काळातचं यशाच्या शिखरावर पोहचलेल्या 25 वर्षीय अभिनेत्रीचा आज वाढदिवस (25th Birthday) आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

मुंबई, 05 एप्रिल: दक्षिणात्य चित्रपट आणि आता लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या (Rashmika Mandanna) चाहत्यांची संख्या कोट्यावधी आहे. अवघ्या काही काळातचं यशाच्या शिखरावर पोहचलेल्या 25 वर्षीय अभिनेत्रीचा आज वाढदिवस (25th Birthday) आहे. तिच्या वाढदिवशी लाखो चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. मोठ्या पडद्यावर चेहऱ्यावर नेहमी हास्य ठेवणाऱ्या रश्मिकाच्या आयुष्यात अनेक चढ उतार आले आहे. खूप कमी लोकांना तिच्या संघर्षाची कहाणी माहित आहे.

रश्मिकाचा जन्म कर्नाटकच्या विराजपेट याठिकाणी झाला होता. ती एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी आहे. तिने मानसशास्त्र, पत्रकारिता आणि इंग्रजी साहित्यामध्ये पदवीचं शिक्षण घेतलं आहे. खरंतर महाविद्यालयीन काळापासून रश्मिकाने मॉडेलिंग करायला सुरुवात केली होती. त्या काळात तिने बर्‍याच टीव्ही जाहिरातीत काम करायला सुरुवात केली होती. त्याचबरोबर 2015 मध्ये, तिने बेंगळुरूमध्ये झालेला एक टॅलेंट हंट जिंकला. हा पुरस्कार तिच्या कारकीर्दीचा टर्निंग पाँइट ठरला. दरम्यान, रश्मिका दिग्दर्शक रिषभ शेट्टीच्या नजरेत आली. त्यानंतर तिने वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी 'किरिक पार्टी' या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. 2016 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. येथून तिचं संपूर्ण आयुष्यचं बदलून गेलं.

(हे वाचा-'थलायवी'च्या गाण्यावरील करण जोहरचा डान्स व्हायरल; कंगनाने पुन्हा उडवली खिल्ली)

या चित्रपटाच्या सेटवर रश्मिका मंदाना आणि अभिनेता रक्षित शेट्टी (Rakshit Shetty) यांच्या मैत्रिचं रुपांतर प्रेमात होऊ लागलं होतं. दरम्यान त्यांच्या अफेअरच्या चर्चांनाही उधाण आलं होतं. त्यावेळी रश्मिकानेही आपण रक्षितला डेट करत असल्याची माहिती सार्वजानिक केली होती. त्यानंतर 2017 मध्ये या दोघांचा साखरपुडाही पार पडला होता. पुढे सर्वकाही व्यवस्थित चालू होतं, पण सप्टेंबर 2018 मध्ये अचानक त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या समोर येऊ लागल्या. जवळच्या काही लोकांनी सांगितलं की समन्वयाच्या अभावामुळे ते दोघं वेगळे झाले आहेत.

(हे वाचा - नॅशनल क्रश Rashmika Mandanna चा स्पोर्टी लूक व्हायरल; PHOTOS पाहून चाहते घायाळ)

तेव्हा रक्षितनं आपल्या एका वक्तव्यात म्हटलं होतं की, 'प्रत्येक गोष्टीला एक अंत असतो. जेव्हा असं होईल तेव्हा आपल्या  सर्वांना सत्य कळेल.' रक्षितनं हे वक्तव्य 2018 मध्ये केलं होतं. तेव्हापासून आतापर्यंत तीन वर्षे उलटली. मात्र रक्षित किंवा रश्मिका या दोघांपैकी कुणीही त्या सत्याबद्दल कधीच काही बोलले नाहीत.

रश्मिका मंदाना लवकरच अमिताभ बच्चन सोबत 'गुड बाय' या चित्रपटात दिसणार आहे. त्याचबरोबर ती सिद्धार्थ मल्होत्रासोबत 'मिशन मजनू' मध्ये देखील दिसणार आहे. रश्मिका सध्या अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा' चित्रपटासाठीही काम करत आहे.

First published:

Tags: Birthday celebration, Rashmika mandanna