मुंबई, 22 एप्रिल- साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदनाचा (Rashmika Mandanna) मोठा चाहतावर्ग आहे. अभिनेत्रीला 'नॅशनल क्रश' म्हणून ओळखलं जातं. दरम्यान अल्लू अर्जुनसोबतच्या 'पुष्पा' या चित्रपटामुळे तिची लोकप्रियता तुफान वाढली आहे. साऊथमध्ये नशीब आजमावल्यांनंतर ही अभिनेत्री आता बॉलिवूडमध्ये (Bollywood) एन्ट्री करण्यास सज्ज आहे. सिद्धार्थ मल्होत्रा आणि अमिताभ बच्चन आधीच तिचे दोन चित्रपट येण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान आता आणखी एका बॉलिवूड चित्रपटात रश्मिका झळकणार आहे. अभिनेत्री लवकरच रणबीर कपूरसोबत (Ranbir Kapoor) अभिनय करताना दिसणार आहे.
रणबीर कपूरच्या आगामी 'अॅनिमल' (Animal) या चित्रपटात पुष्पा फेम अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार असून त्याची अधिकृत घोषणाही करण्यात आली आहे. दोघेही चित्रपटाच्या शूटिंगसाठी मनालीला पोहोचले आहेत. रश्मिका सध्या अनेक प्रोजेक्ट्समध्ये व्यग्र आहे. पुष्पा आणि श्रीवल्ली हे नाव सध्या घराघरात तोंडपाठ झाले आहे. या कलाकारांचे आगामी चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक आता प्रतीक्षा करत आहेत. आज या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे.गेल्या अनेक दिवसांपासून रश्मिका 'मिशन मजनू' या पहिल्या हिंदी चित्रपटात व्यग्र होती. जो 10 जून 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे.
इतकंच नव्हे तर सिद्धार्थ मल्होत्राच्या 'मिशन मजनू'नंतर, ती अमिताभ बच्चन स्टारर विकास बहल दिग्दर्शित 'गुडबाय' या हिंदी चित्रपटातही दिसणार आहे. याशिवाय ती थालापती विजयच्या चित्रपटातही दिसणार आहे. त्या चित्रपटाचं नाव अद्याप ठरलेलं नाहीय. एकूणच, रश्मिकाकडे सध्या भरपूर चित्रपटांच्या ऑफर्स आहेत. अभिनेत्री तिच्या कारकिर्दीच्या फारच चांगल्या टप्प्यात आहे.
नुकतंच एका मुलाखतीमध्ये बोलताना रश्मिका म्हणाली होती की, 'बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्याचा हा एक रोमांचक काळ आहे. आणि मी काही सर्वात रोमांचक चित्रपट करत आहे'. मी या सर्व चित्रपटांचा भाग नसते, तर मी त्या प्रेक्षकांच्या यादीत असते ज्यांना हे चित्रपट थिएटरमध्ये पाहायला आवडले असते.. मी या वर्षाची खरोखरच आतुरतेने वाट पाहात आहे. कारण ही सर्व पात्रे एकमेकांपासून खूप वेगळी आहेत.मला विविध अभिनेते, दिग्दर्शक,टीमकडून नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात. त्यामुळे मी फारच वेगळं आयुष्य जगत असल्याचा अनुभव मिळतो'.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood News, Entertainment, Ranbir kapoor, Rashmika mandanna