मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Goodbye Collection: साऊथ सुंदरी बॉलिवूडमध्ये फ्लॉप? पाहा रश्मिकाच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन

Goodbye Collection: साऊथ सुंदरी बॉलिवूडमध्ये फ्लॉप? पाहा रश्मिकाच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन

गुडबाय

गुडबाय

अमिताभ बच्चन आणि रश्मिका मंदाना स्टारर चित्रपट गुडबाय बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करताना दिसत नाही.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Sayali Zarad

मुंबई, 10 ऑक्टोबर : अमिताभ बच्चन आणि रश्मिका मंदाना स्टारर चित्रपट गुडबाय बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करताना दिसत नाही. अमिताभ बच्चनसारखी मोठी स्टारकास्ट असूनही हा चित्रपट अपयशी ठरताना दिसत आहे. पहिल्या दिवशी संथ सुरुवात करणारा गुडबाय आता देखील त्याच संथ गतीने प्रगती करत आहे. त्यामुळे रश्मिकाची जादू पहिल्या चित्रपटात चालली नसल्याचं दिसत आहे. चित्रपटाच्या तिसऱ्या दिवसाचे कलेक्शन आले असून वीकेंडलाही गुडबायचा फायदा झाला नाही.

साऊथमध्ये रश्मिकाचा प्रत्येक चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करत असतो पण बॉलिवूडमध्ये तिची जादू चालत नसल्याचं दिसून आलं. कलेक्शन sacnilk.com च्या रिपोर्टनुसार, गुडबायच्या तिसऱ्या दिवशीच्या कलेक्शनमध्ये कोणतीही लक्षणीय वाढ झालेली नाही. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 1.2 कोटी, दुसऱ्या दिवशी 1.59 कोटी आणि तिसऱ्या दिवशी सुमारे 1.50 कोटींचा व्यवसाय केला आहे. त्यानंतर एकूण कलेक्शन सुमारे 4.29 कोटी होईल. रविवारी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये वाढ होईल अशी अपेक्षा होती मात्र तसे झाले नाही.

हेही वाचा -  रश्मिका-विजय मालदीवमध्ये एकत्र? त्या फोटोवरुन रंगली चर्चा

अमिताभ आणि रश्मिका व्यतिरिक्त नीना गुप्ता, सुनील ग्रोवर आणि पावियल गुलाटी देखील या चित्रपटात दिसले आहेत. गुडबाय हा एक फॅमिली ड्रामा चित्रपट आहे जो तुमच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित करतो तसेच पालक आणि मुलांच्या नात्यावरही भर देतो.

दरम्यान, नॅशनल क्रशचा पहिलाच बॉलिवूड सिनेमा असल्यामुळे तिचे चाहते तिच्या बॉलिवूड पदार्पणासाठी खूप उत्साही होते. मात्र पहिल्या सिनेमामध्ये तिची जादू जास्त चालली नसल्यामुळे चाहत्यांमध्ये काही प्रमाणात निराश निर्माण झाली आहे.

First published:

Tags: Amitabh Bachchan, Bollywood, Bollywood News, Rashmika mandanna