मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

BB 15: रश्मी देसाईला आजही वाटते Ex Husband च्या नावाची भीती; रडताना दिसली अभिनेत्री

BB 15: रश्मी देसाईला आजही वाटते Ex Husband च्या नावाची भीती; रडताना दिसली अभिनेत्री

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री   (Tv Actress)  रश्मी देसाईची   (Rashmi Desai)  पर्सनल लाईफ फारच दुःखद आहे. काही वर्षांपूर्वी तिनं नंदिश संधूसोबत  (Nandish Sandhu)  लग्न केलं होतं. परंतु काही काळातच त्यांचा घटस्फोट झाला होता.

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री (Tv Actress) रश्मी देसाईची (Rashmi Desai) पर्सनल लाईफ फारच दुःखद आहे. काही वर्षांपूर्वी तिनं नंदिश संधूसोबत (Nandish Sandhu) लग्न केलं होतं. परंतु काही काळातच त्यांचा घटस्फोट झाला होता.

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री (Tv Actress) रश्मी देसाईची (Rashmi Desai) पर्सनल लाईफ फारच दुःखद आहे. काही वर्षांपूर्वी तिनं नंदिश संधूसोबत (Nandish Sandhu) लग्न केलं होतं. परंतु काही काळातच त्यांचा घटस्फोट झाला होता.

पुढे वाचा ...
  • Published by:  Aiman Desai

मुंबई,31 डिसेंबर-   छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री   (Tv Actress)  रश्मी देसाईची   (Rashmi Desai)  पर्सनल लाईफ फारच दुःखद आहे. काही वर्षांपूर्वी तिनं नंदिश संधूसोबत  (Nandish Sandhu)  लग्न केलं होतं. परंतु काही काळातच त्यांचा घटस्फोट झाला होता. त्यांनतर ती अरहान खानसोबत रिलेशनशिपमध्ये होती. त्याच्यासोबतही तिचा ब्रेकअप झाला.त्यामुळे तिची पर्सनल लाईफ नेहमीच चर्चेत असते. सध्या ती 'बिग बॉस 15'   (Bigg Boss 15)  मुळे चर्चेत आहे. येत्या काही भागात रश्मी देसाईच्या पर्सनल लाईफविषयी चर्चा झालेली पाहायला मिळणार आहे. इतकंच नव्हे तर रश्मी या भागामध्ये आधी राखी सावंत  (Rakhi Sawant)  आणि नंतर उमर रियाजला  (Umar Riaz)  आपल्या पर्सनल लाईफच्या वाईट अनुभवाबद्दल बोलून रडताना दिसणार आहे.

बिग बॉस १५ सध्या फारच चर्चेत आहे. घरामध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री झाल्यापासून नवनवीन राडे पाहायला मिळत आहेत. बिग बॉसच्या पुढील भागामध्ये रश्मी देसाईच्या पर्सनल लाईफवर चर्चा झालेली पाहायला मिळणार आहे. यामध्ये राखी सावंत अभिनेत्री रश्मी देसाईला तिच्या आणि नंदिश संधूच्या घटस्फोटाबद्दल विचारताना दिसून येणार आहे. परंतु रश्मी देसाई याबद्दल तिला काहीही सांगण्याचं टाळते. ती याबद्दल काहीही बोलू इच्छित नसल्याचं स्पष्ट करते. माझ्या या बोलण्याने एका दुसऱ्या व्यक्तीच्या आयुष्यावर मोठा परिणाम होऊ शकतो, असंही ती यावेळी सांगते. तसेच रश्मीने म्हटलं हं, की ती आजही तिच्या पूर्व पतीच्या नावानेसुद्धा घाबरते'.

पुढं बोलताना रश्मी म्हणाली, 'सध्या आम्ही फारच चांगल्या ठिकाणी आहे. त्यामुळे तिला त्यावर कोणताही परिणाम होईल अशा कोणत्याच गोष्टीवर ती बोलू इच्छित नाही. तसेच ती म्हणते मला अशा कोणत्याच गोष्टीवर बोलायचं नाही ज्या माझ्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम करतील. रश्मी म्हणते, 'मला कोणालाही दुःख द्यायची मूळीच इच्छा नाही. यावर उत्तर देत राखी म्हणते, 'म्हणजे वाईट होईल?'.त्यांनतर रश्मी देसाई गार्डनमध्ये पूलजवळ बसून रडताना दिसून येते. तर दुसरीकडे राखी सावंत उमर रियाज आणि अभिजित बिचुकलेजवळ रश्मीबाबत आपली नाराजी व्यक्त करतांना दिसते. यावेळी बोलताना राखी म्हणते, 'रश्मी कायम माझ्या पर्सनल लाईफबद्दल जाणून घ्यायला उत्सुक असते. माझ्याबद्दल सर्वकाही विचारून घेते. परंतु आपल्याबद्दल कधीच काही नाही सांगत'.

(हे वाचा:सुष्मिता सेनपासून आमिर खानपर्यंत, 2021 सालात या 6 सेलिब्रिटींचं ब्रेकअप )

राखी सावंतचं बोलणं ऐकून उमर रियाज तिथून निघून जातो. त्यांनतर तो रश्मी जवळ जाऊन तिला धीर देण्याचा प्रयत्न करतो. तो रश्मीला तिच्या रडण्याचा कारण विचारतो. यावर उत्तर देत रश्मी म्हणते, 'मला आजही नंदिश, लग्न, घटस्फोट या गोष्टींवर बोलायला दुःख होतं. त्याच्या संबंधी कोणतीच गोष्ट बोलायला मला आवडत नाही. मला आजही त्याच्या बाबतीत विचार करून भीती वाटते'. आम्ही आपल्याला सांगू इच्छितो सध्या बिग बॉसच्या घरात रश्मी आणि उमर एकमेकांच्या जवळ येत आहेत. रश्मीने उमरबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्यांनतर या दोघांमध्ये रोमँटिक सीन पाहायला मिळाले होते.

First published:

Tags: Bigg boss, Entertainment, Tv shows