मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /‘या चुकीमुळे करिअरला लागला ब्रेक’; रश्मी देसाईनं केला धक्कादायक खुलासा

‘या चुकीमुळे करिअरला लागला ब्रेक’; रश्मी देसाईनं केला धक्कादायक खुलासा

ती चूक मी पुन्हा करणार नाही असा निश्चय रश्मीनं केला आहे.

ती चूक मी पुन्हा करणार नाही असा निश्चय रश्मीनं केला आहे.

ती चूक मी पुन्हा करणार नाही असा निश्चय रश्मीनं केला आहे.

मुंबई 6 ऑगस्ट: रश्मी देसाई (Rashami Desai) ही छोट्या पडद्यावरील एक नामांकित अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. विविध मालिकांमधून तब्बल एक दशक प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी रश्मी नुकतीच तंदुर या वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस आहे. (Rashami Desai TV serial) परंतु या सीरिजमध्ये झळकण्यापूर्वी ती अक्षरश: बेरोजगार होती. अनेक नामांकित निर्मात्यांकडे तिने ऑडिशन दिलं. परंतु केवळ टीव्ही अभिनेत्री असल्यामुळे तिला काम मिळत नव्हतं. (Rashami Desai Big Mistake) परंतु आता ती चूक मी पुन्हा करणार नाही असा निश्चय रश्मीनं केला आहे.

‘कार घ्यायला पैसे आहेत पण कर भरायला नाही?’ न्यायालयाने धनुषला फटकारलं

आलिकडेच टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत रशीनं आपल्या करिअरवर भाष्य केलं. त्यावेळी तिने आपल्या आयुष्यातील या प्रतिकूल परिस्थितीत आलेला अनुभव सांगितला. ती म्हणाली, “मी माझ्या करिअरची सुरूवात चित्रपटातून केली. परंतु नंतर मी टीव्ही मालिकांमध्ये स्थिरस्थावर झाले. कदाचित मला तिथे काम आणि पैसे मिळत होते म्हणून मी त्या माध्यमाबाहेर पडण्याचा विचार केला नाही. पण यामुळे माझ्यावर टीव्ही अभिनेत्रीचा शिक्का मारण्यात आला. चित्रपटांमध्ये मला काम मिळत नव्हतं. कारण माझी फेसव्हॅल्यु नाही असं म्हटलं जायचं. परंतु आता ती चूक मी पुन्हा करणार नाही. आता मी कुठल्याही एका माध्यमात स्थिरावणार नाही. मालिका, चित्रपट, वेब सीरिज या तिन्ही प्रकारांमध्ये स्वत:ला सिद्ध करणार आहे.”

‘अरुंधतीची वेदना मी अक्षरश: जगलेय’; तो सीन करताना मधुराणी यांना कोसळलं रडू

रश्मीनं 2002 साली कन्यादान या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्यानंतर गजब भली रामा, नदिया के तीर, कब हो गुनाह हमार, पप्पू से प्यार हो गई यांसारख्या अनेक भोजपुरी चित्रपटांमध्ये ती झळकली. दरम्यान 2008 साली तिनं रावण या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. यामध्ये तिनं मंदोदरी ही मुख्य व्यक्तिरेखा साकारली होती. तिला खरी लोकप्रियता मिळाली ती उत्तरण या मालिकेमुळं. मालिकेंसोबतच तिनं बिग बॉस, झलक दिखलाजा, नच बलिये यांसारख्या रिअलिटी शोंमध्ये देखील भाग घेतला आहे. मात्र इतका अनुभव असताना देखील तिला अद्याप बॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी मिळालेली नाही.

First published:
top videos

    Tags: Tv actress, Web series