मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

राकेश बापट-शमिता शेट्टीच्या 'त्या' VIDEOवर रिद्धी डोगराने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया

राकेश बापट-शमिता शेट्टीच्या 'त्या' VIDEOवर रिद्धी डोगराने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया

राकेशची पहिली पत्नी आणि अभिनेत्री रिद्धी डोगरा हिने बिग बॉस 15 च्या घरात वाइल्ड कार्ड एन्ट्रीवर प्रतिक्रिया दिली आहे. बिग बॉस ओटीटी दरम्यानही रिद्धीने राकेशला सपोर्ट केला होता. आता तिने शमिता आणि राकेशच्या नात्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 8 नोव्हेंबर- ‘बिग बॉस 15’ च्या (Bigg Boss 15) घरामध्ये दररोज समीकरणे बदलत असतात. येणाऱ्या भागांमध्ये अनेक नवे ट्विस्ट येणार आहेत. राकेश बापट आणि नेहा भसीनने वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून घरात प्रवेश केला आणि शमिताला आश्चर्यचकित केले. आता, राकेशची  (Raqesh Bapat)पहिली पत्नी आणि अभिनेत्री रिद्धी डोगरा (Ridhi Dogra)हिने बिग बॉस 15 च्या घरात वाइल्ड कार्ड एन्ट्रीवर प्रतिक्रिया दिली आहे. बिग बॉस ओटीटी दरम्यानही रिद्धीने राकेशला सपोर्ट केला होता.

राकेश बापट शमिता शेट्टीला मिठी मारतानाचा एक भावनिक व्हिडिओ शेअर करत रिद्धीने राकेशला शुभेच्छा दिल्या. तिनं लिहिले आहे की, “चांगला खेळ. नीट राहा." नेहा भसीनने शमिता शेट्टीला आश्चर्यचकित केले, तर राकेशने स्वत: गोरिलाच्या अवतारात घरात प्रवेश केला. राकेशला पाहून शमिता हादरली आणि त्याला मिठी मारण्यासाठी उडी मारली. या दोघांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

वाचा : Puneeth Rajkumar च्या डॉक्टरला मिळालं पोलीस संरक्षण; अभिनेत्याच्या मृत्यूनंतर...

रिद्धी डोगराने याआधीही यावर प्रतिक्रिया दिली होती. म्हणाली होती की, राकेश खुश असेल तर मीही खुश आहे. हा त्याचा वैयक्तिक स्पेस आहे. बिग बॉसच्या घरात येण्यापूर्वी राकेशने इंडिया टुडेला सांगितले होते की, मला सुरुवातीपासूनच बिग बॉस 15 मध्ये जाण्याची इच्छा होती. पण मी ते करू शकलो नाही. BB OTT नंतर, मला थोडा वेळ हवा होता. मी पुन्हा शोला हो म्हणायला माझा वेळ घेतला. आणि, माझ्याकडे इतर काही काम होतं ते देखील पूर्ण करणे आवश्यक होतं.

याशिवाय शनिवारी सलमान खानने स्पर्धकाला मोठा धक्का देत बाहेर काढलेल्या स्पर्धकाच्या नावाची घोषणा केली. वीकेंड का वार भागात, सलमान खानने सर्व स्पर्धकांना त्यांच्या आठवडाभर चालणाऱ्या खेळाबद्दल सांगितले.दिवाळी स्पेशल वीकेंड असल्याने स्पर्धक इव्हिक्शनसाठी तयार नव्हते. पण सलमान खानने सर्वांना चकित करत इव्हिक्शनची घोषणा केली. स्प्लिट्सविला विजेती मायशा अय्यर (Miesha Ayyar Evicted) आता शोमधून बाहेर पडली आहे.शो दरम्यान मायशाच्या प्रेमात पडलेला ईशान सेहगल हे ऐकताच भावुक होऊन रडू लागला.

वाचा : 'बडे अच्छे लगते है' श्रुती मराठेच्या वेस्टर्न LOOK वर चाहते फिदा; दिल्या जबरदस्त

यावेळी बिग बॉस 15 च्या घरातून दोन स्पर्धक बाहेर पडणार आहेत. आज म्हणजेच रविवारी एका स्पर्धकाला घराबाहेरचा रस्ता दाखवला जाईल. या आठवड्यात नॉमिनेशनमध्ये पाच जण होते. मायशासोबत सिंबा नागपाल, अफसाना खान, उमर रियाझ, इशान सहगल यांनाही घराबाहेर पडण्यासाठी नॉमिनेट करण्यात आले होते. उद्या काय होणार हे आजही घरच्यांना माहीत नाही. मायशा अय्यरच्या जाण्याने इशान सहगल अस्वस्थ दिसत होता, तर मायशा एकदम शांत दिसत होती.

First published:

Tags: Bigg boss, Bigg boss marathi, Bollywood News, Entertainment