‘यापुढे केवळ क्रिप्टोकरन्सीच हवी’; रफ्तारनं नाकारलं डॉलर्समधील मानधन

‘यापुढे केवळ क्रिप्टोकरन्सीच हवी’; रफ्तारनं नाकारलं डॉलर्समधील मानधन

रफ्तार ठरला क्रिप्टोकरन्सीमध्ये मानधन घेणारा भारतातील पहिला कलाकार

  • Share this:

मुंबई 19 जून: हसिनों का दिवाना, फ्लाइंग जेट, मूव्ह, ढिशूम यांसारख्या अनेक सुपरहिट गाण्यांद्वारे रसिकांचं मनोरंजन करणारा रफ्तार (Indian lyricist Raftaar) हा बॉलिवूडमधील सध्याच्या सर्वाधिक लोकप्रिय रॅपर्सपैकी एक म्हणून ओळखला जातो. त्यानं आपल्या अनोख्या संगीतशैलीच्या जोरावर स्वत:चा असा एक वेगळा चाहतावर्ग निर्माण केला आहे. रफ्तार हा चित्रपटांसोबतच आपल्या लाईव्ह स्टेज शोसाठी देखील प्रसिद्ध आहे. त्याचे शो पाहण्यांसाठी नेहमीच विक्रमी गर्दी होते. त्यामुळं मोठमोठ्या म्यूझिक कंपन्या त्याच्यासोबत लाईव्ह शो करण्यासाठी नेहमीच तयार असतात. मात्र त्याचे हे शो अरेंज करणं आता पहिल्याइतकं सोपं राहणार नाही. कारण यापुढे तो केवळ क्रिप्टोकरन्सीमध्येच (cryptocurrency) मानधन घेणार आहे.

भारतीय अभिनेत्रीसाठी जगातील सर्वात श्रीमंत बिझनसमॅन झाला फोटोग्राफर; क्लिक केले ग्लॅमरस फोटो

रफ्तारनं एक मोठी घोषणा केली आहे. यापुढे तो केवळ क्रिप्टोकरन्सीमध्येच मानधन घेणार आहे. येत्या डिसेंबर महिन्यात रफ्तारचा एक मोठा स्टेज शो अमेरिकेत होणार आहे. यासाठी त्यानं चलनात असलेल्या करंसीऐवजी क्रिप्टोकरन्सीमध्ये मानधन घेतलं. तो म्हणाला, “ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या दिशेनं मी कायमच आकर्षित झालो आहे. या माध्यमाची क्षमता अद्याप लोकांच्या लक्षात आलेली नाही. पण येत्या काळात हिच करंसी प्रमाण मानली जाईल याची मला खात्री आहे. इतर लोक काय विचार करतात मला माहित नाही. पण यापुढे मी केवळ क्रिप्टोकरन्सीमध्येच मानधन स्विकारणार आहे.” क्रिप्टोकरन्सीमध्ये मानधन घेणारा तो भारतातील पहिला कलाकार ठरला आहे.

ऐश्वर्यामुळं सुष्मिता सेननं खाल्ले होते आईचे फटके; सांगितला चकित करणारा किस्सा

क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय?

आभासी चलन ही संकल्पना आता जवळपास दशकभर जुनी झाली आहे. त्यामुळे आभासी चलन म्हणजे काय, हे बहुतेकांना माहीत असेलच. आभासी चलन अर्थात ‘क्रिप्टोकरन्सी’ हे संगणकीय अल्गोरिदमच्या आधारे निर्माण करण्यात आलेले चलन आहे. या चलनाला भौतिक रूप नसते. मात्र, तुम्ही आर्थिक देवाणघेवाणीसाठी ते वापरू शकता. एका संगणकीय प्रोग्रॅममधील गणितीय आकडेमोड करून ‘बिटकॉइन’ अस्तित्वास आले. त्यानंतर गेल्या दशकभरात शेकडो प्रकारच्या ‘क्रिप्टोकरन्सी’ संगणकीय जगात निर्माण झाल्या. अनेक देशांतील बँका, हॉटेल, कंपन्या, संकेतस्थळे यांनी आभासी चलनाचा स्वीकार केला आहे. त्यामुळे या चलनाचे मूल्यही दिवसेंदिवस वाढत चालले आहे. यातूनच या आभासी चलनांचे विनिमय बाजार उभे राहिले. या बाजारांत जगभरातील आभासी चलनांचे भौतिक चलनांच्या तुलनेतील मूल्य दररोज ठरते.

Published by: Mandar Gurav
First published: June 19, 2021, 4:58 PM IST
Tags: moneysong

ताज्या बातम्या